शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

कोरोना आणि मानसिक आरोग्य : प्रा. सुरेश यादव सर

कुंभारगाव :(ता.पाटण)
कोरोना आणि मानसिक आरोग्य
“मन करा रे प्रसन्न
 सर्व सिद्धीचे कारण”
आज ‘कोवीड१९’ या विषाणूने जगात हाहाकार उडवला आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगाला हादरून सोडणार्‍या या आजाराने उद्योग धंदा पासून ते जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरे दिले आहेत. आजच्या घडीला या विषाणू बद्दलच्या प्रश्नांची निश्चित उत्तर कोणापाशी नाही. हा इतका सर्वदूर पसरला आहे की तो जागतिक सामाजिक मानसिक आजार झाला आहे. कोरोनाची साथ जेवढ्या वेगाने पसरत आहे. त्यापेक्षाही जास्त वेगाने या आजारामुळे निर्माण झालेल्या मानसिक उलथापालथी ला आपण सामोरे जात आहोत. आज संपूर्ण जग जागतिकीकरणाने जवळ आलेले आहे. जगात सर्व देशांमध्ये जागतिक महासत्ता होण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे .सध्या जागतिकीकरणामुळे जग इतकं जवळ आला आहे ,की ही मानसिकता एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित राहिली नसून जागतिक ,सामाजिक ,मानसिकता असं व्यापक स्वरूप त्याला आलं आहे.
 या सुरक्षितेच्या परिस्थितीत जगभरातील माणसं श्रीमंत-गरीब शिक्षित-अशिक्षित लहान मोठे सगळेच कोणामुळे पुढे काय होईल हे माहीत नसलेल्या परिस्थितीमुळे घाबरलेल्या अवस्थेत जगत आहेत .या तलावात मानसिक आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत .या लोग डाऊन आणि विलगीकरण यामुळे तर या घातक परिणामांची व्याप्ती अजून वाढू शकते. आज समाजात आजूबाजूला कुटुंबात कोणीही खोकले ,शिंकले तरी नात्यांमध्ये संशयाची सुई फिरू लागली आहे .दरवाज्याची कडी, लिफ्टचे बटन ,दिव्याचे बटन ही आता संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. दारावरून जाणारा भाजीवाला, दुकानातून आणली दूधाची पिशवी ,किराणामाल ,बँकेतून आणलेले पैसे सुद्धा आपल्या संशय नजरेतून सुटलेली नाहीत. एवढी आपली मानसिकता धरू लागली आहे.
 खरी समस्या निर्माण झाली आहे ,ती मनाचे आरोग्य राखण्याची वातावरणातील नकारात्मकता आणि हे सर्व कधी संपणार याची चिंता यामुळे अनेकजण शरीरापेक्षा मनाने चिंतेत आहेत या संकटमय काळात आपल्याला मनाचे आरोग्य आणि  शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. १९१७-१८ च्या दरम्यान म्हणजे पहिल्या महायुद्धात यावेळी स्पॅनिश साथ येऊन गेली होती. त्यावेळी जगभरात साधारण पाच कोटी माणसं या आजाराच्या साठीत गेली होती. त्यावेळी सात लाख जणांना या आजारात प्राण गमावले होते. त्याच अमेरिकेची आज जगाला जागतिक महासत्ता म्हणून ओळख आहे. माणसाचे मन म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. 
आजपर्यंत जगाने अनेक रोगाच्या साथी अनुभवलेले आहेत सूर्य अस्ताला गेला म्हणून काय झाले नवीन दिवस पुन्हा जाणारच आहे. आयुष्यात अशी अनेक वादळे आपल्याला अनुभवास मिळणार आहेत ,परंतु या वादळात सुद्धा आपली मुळे मातीत घट्ट रोवून ठेवता आली पाहिजेत. हा समाजात गरीब, श्रीमंत ,शेतकरी ,व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी म्हणजे सर्वच घटक आज चिंतेत आहेत. मिळकत नसल्यामुळे अनेक जणांना चिंतेने ग्रासलेले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार यांच्या काळात 70% कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. याच वेळी सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याला राखता आलं पाहिजे. तनावाने आपली शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यावेळी एखादी मोठी समस्या आपल्यापुढे उभी राहते. त्या वेळी त्यातून  एक संधी निर्माण होते. या संकटाच्या काळात आपण कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, आपले आवडते छंद जोपासणे आपले नातेवाईक मित्र यांना जरूर फोन करून संवाद साधला पाहिजे .त्यामुळे आपले मन निश्चितच हलके होईल. त्याच प्रमाणे घरातच शारीरिक व्यायाम मध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार ,योगासने, ध्यान धारणा, मनन, चिंतन यांची सांगड घालता आली पाहिजे .
सर्वात जास्त घरात यादरम्यान अडचण आहे, ती लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांची त्यांना गुंतवून ठेवण्याची कला आपण करावी ,कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समजून घेऊन कुटुंब एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. परिस्थिती कधीही बदलू शकते, त्यामुळे प्रत्येकपरिस्थितीला तोंड द्यायची तयारी आपल्याला ठेवता आली पाहिजे.
सध्या वर्तमानपत्र, टीव्ही, प्रसारमाध्यमे समाजमाध्यमे यावर सर्वत्र फक्त ‘कोरोनाव्हायरस’ हा एकच विषय आहे. .आपण याबद्दल मानसिक दृष्ट्या इकडे इतके अतिसंवेदनशील झालो आहेत, की आपण आपल्या नकळत त्याबद्दलच जास्त वाचतो, तेच पाहतो ,तेच जास्त ऐकतो, क्षणोक्षणी सावध राहतो, एकच एका विषयाची चर्चा करत राहतो. जणू काही आपण जीवनाच्या इतर बाजू विसरून गेलो आहोत .याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करून बेफिकीर राहणे असं नव्हे तर टोकाची संवेदनशीलता कमी करणे .कोरोनांचे बळी म्हणजे क्रिकेटचा स्कोअर नव्हे ,आपल्या मानसिकतेत कोरोना व्यतिरिक्त इतर विषयांना ही पुरेसा वाव दिला ,तर नकारात्मक भावनांच्या छायेतून आपण बाहेर येऊ शकतो. 
‘कोवीड१९’ यामुळे जगात उलथापालथ झाली हे खरं असलं तरी त्यामुळे होणारी मानसिकता उलथापालथ आपण कमी करू या!
“ घरातच रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा” 
प्रा. सुरेश रघुनाथ यादव 
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

५ टिप्पण्या:

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...