शनिवार, २५ एप्रिल, २०२०

काळगाव;- मस्करवाडी येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत

मस्करवाडी येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील मस्करवाडी (काळगांव) येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत आहे. जमिनीपासून काही अंतरावरच हा पोल जीर्ण झालेला आहे. खांबाला आधार देणाऱ्या बाजूच्या तारेमुळेच तो खांब उभा आहे. अन्यथा तो केव्हाही खाली पडू शकतो. सदरच्या खांबामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून सदर वीजेचा खांब बदलावा. जेणेकरुन भविष्यात होणारी हानी टाळली जावू शकते.
सदरचा खांब बदलण्याची मागणी मस्करवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...