आज सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये एक महिला, 3 वर्षांचा व 13 वर्षांचा अशा दोन मुलांंचा समावेश आहे. आज सापडलेल्या बाधितांमध्ये वनवासमाची येथील 5, आगाशिवनगर (मलकापूर) येथील 3,येथील प्रत्येकी एक, तर कासेगांव व कामेरी येथील प्रत्येकी एक अशा 12 जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान मलकापूरधील आगाशिवनगर येथे 4 आणि अहिल्यानगर येथे 2 असे 6 कोरोना रूग्ण सापडले आहेत. हे कृष्णा हॉस्पिटलच्या सिव्हिल डिपार्टमेंटमधील कर्मचारी आहेत. यातील कामेरी व कासेगाव येथील कर्मचारी वगळता अन्य मलकापूरमध्ये रहात आहेत. मलकापूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने मलकापूर नगरपालिकेने घर टू घर सर्व्हे सुरू केला आहे. प्रत्येक परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.शनिवारी वनवासमाची येथील पाच जण व आगाशिवनगर (मलकापूर) येथे तीन जण कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांना कृष्णा व कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रविवारपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा