रविवार, १९ एप्रिल, २०२०

कोरोना :- साताऱ्यात दोन नवे रुग्ण

सातारा: - तालुक्यातील उंब्रज जवळील चरेगाव आणि ओगलेवाडी जवळील बाबरमाची येथील दोन रुग्णांचे अहवाल आज पॉझीटीव्ह आले. त्यामुळे कराड तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. दरम्यान संबंधित दोन्ही ठिकाणच्या संशयीताच्या संपर्कातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागाकडुन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
मागिल महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापामुळे दाखल केले होते आणि गेल्या महिन्यात पुण्यावरून आलेल्या 30 वर्षीय पुरुष त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे दाखल केले होते या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...