शनिवार, १८ एप्रिल, २०२०

कुंभारगाव: अतिउत्साही तरूणाई सावधान नाहीतर खावी लागणार जेलची हवा.

कुंभारगाव,मान्याचीवाडी ; 

कोरोना व्हायरसमुळे केंद्र शासनाकडून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अतिउत्साही तरूण कुंभारगाव भागातील नागरिकांकडून लॉकडाऊनची ऐशी-तैशी केली जात असल्याचे दृश्य आज शनिवारी पहायला मिळाले.त्यामुळे पोलिस प्रशासनाने रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांसह वाडीवस्ती भागातील अतिउत्साही तरूणाईला लाठी प्रसाद दिलेला आहे तरी काही सुधारणा होत नाही म्हणून विनाकारण फिरण्याऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करणार कोणाचीही गय करणार नाही असा इशारा ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी कुंभारगाव मान्याचीवाडी येथे बोलताना दिला आहे. पोलिसांनी आणखीन कडक पवित्रा घेतला आहे.कुंभारगाव परिसरातील तरूणाईसह ज्येष्ठांना देखील कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे.

येथील नागरिक सर्रास घराबाहेर पडून एकत्र जमत आहेत. काही ठिकाणी असलेल्या चौकांमध्ये कट्ट्यांवर सभा भरत आहेत.पोलिसांकडून यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक नागरिक पोलिस गेल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसबाबत येथील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे. 


२ टिप्पण्या:

  1. लोकांना lockdown म्हणजे सुट्टी वाटते,पण लोक हा का विचार करत नाहीत,जे चाललंय ते लोकांसाठी च चाललंय.पोलीस आपला जीव धोक्यात घालून रात्र दिवस पहारा देत आहेत, काही पोलीसांना तर आपले प्राण गंमवावे लागलेत.तरी याचा विचार लोकांनी करायला हवा,यांनी lockdown ची कडक अंमलबजावणी केली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  2. पोलिसाना सहकार्य करा ते आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतात त्याना कूटुंब आहेत तरी ते आपल्यासाठी करताहेत याची जाणिव ठेवा

    उत्तर द्याहटवा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...