काळगाव (ता.पाटण) परिसरातील डोंगरात रचलेल्या सापळ्यात काल दोन सप्लायर्स सापडले. दोघेही 20 ते 30 वयोगटातीलच आहेत.सहा. पो.निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काळगावच्या डोंगरातून सुरू असलेली अवैध दारू वाहतूक रोखून दुचाकी व विदेशी दारूच्या बाटल्या असा सुमारे 34 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघा युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.लॉकडाऊनमुळे शहरातील जनजीवन ठप्प आहे. प्रमुख चौक, बाजारपेठांमधील अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच काय पिठाच्या गिरण्या शोधण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. भाजीपाल्यासाठी तासन् तास तिष्ठत राहावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे दीडशेच्या 'विदेशी' बाटलीसाठी साडेचारशे, पाचशे रुपये गेले तरी बेहत्तर, पण ढोसायचीच...! 'संचारबंदी'तही दारू तस्करांनी गल्लोगल्ली बाजार मांडलाय त्याला आत्ता आळा बसेलअसे वाटते.कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने सर्वत्र 'जैसे थे'ची स्थिती आहे.रोजच्या गरजेच्या वस्तू मिळणेही महाकठीण बनले. बिनकामाचे घरातून बाहेर पडलेल्यांना चौकाचौकांत काठ्यांचा प्रसाद खावा मिळतो आहे तरी नागरिकांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही.
जिल्हा लॉकडाऊन...? मग, दारूसाठा आला कोठून?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असले, तरी सार्यांनाच समान न्याय या तत्त्वाचा काहीसा विसर पडल्याचे दिसून येते. शहर, जिल्ह्यात नेमका हाच विषय सार्यांनाच खटकणारा आहे. लॉकडाऊनमुळे औषधे दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प आहेत. हॉटेल्स, बार, परमिट रूम, वाईन शॉपी एव्हाना गावठी दारूची अड्डेही शंभर टक्के बंद असताना दारू तस्करांकडे देशी, विदेशी दारूचा जिल्ह्याला पुरेल एवढा दारूसाठा आला कोठून, हा सामान्यांचा सवाल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा