शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

कुंभारगाव,चाळकेवाडी ; श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वतीने मोपत मास्क वाटप

कुंभारगाव / चाळकेवाडी (ता.पाटण) तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील समाजसेवक चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वतीने करोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले,

कोरोना संकटाच्यावेळी आपण आपल्या गावासाठी, लोकांसाठी काय करु शकतो, या माणूसकीच्या विचारातून गावकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे काम समाजसेवक चंद्रकांत चाळके साहेब यांनी केले आहे
कोणतेही संकट हे माणसातील लढण्याच्या शक्तीला प्रेरणा देणारे असते. अट एकच असते की तुम्ही त्या संकटाने विचलित न होता त्याला संधीच्या स्वरुपात पाहिले पाहीजे. मग त्या संकटातून तुमच्या लढण्याची क्षमता तर वाढतेच पण इतरांनाही ती सहायक, प्रेरक ठरते. 
आज सगळं जग कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. यात प्रत्येक जण आपल्यापरिने काही तरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रत्येक कुटुंबियांना घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवून  मास्क वाटण्यात आले.या सामाजिक बांधीलकीतून मोफत मास्क देत गावकऱ्यांना मास्क वापरण्यासाठी जे प्रोत्साहन दिले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आशा परिस्थितीत खचून न जाता प्रत्येकाने आपल्यापरिने लढले पाहीजे, टिकुन राहीले पाहीजे ही प्रेरणा स्वतःच्या कृतीतुन चाळके साहेबांनी सहजतेने दाखवली आहे.
या कार्यत भैरवनाथ गणेश मंडळ,बाल गणेश मंडळ,कल्पतरू गणेश मंडळ,नागनाथ गणेश मंडळ,शिवशक्ती गणेश मंडळ,युवा शक्ती ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ चाळकेवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यामुळे चाळकेवाडीतील नागरिकांमधून समाधान वक्त केलं जातं आहे​.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...