*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व सतत अतिवृष्टी होणारा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांना उर्मी सामाजिक संस्था पुणे व हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.,विवो पुणे यांचेवतीने रेनकोटचे वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटण येथे करणेत आले..त्याप्रसंगी हिसोवा संस्थेचे व्यवस्थापक प्रतिनिधी सौम्या बक्षी, रोहीत वाघळे, किरण जावळे, सुधीर अडमुठे, विवेक साळुंखे, उर्मी संस्थेचे किशोर पेडणेकर, राहूल चुनीदास, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख संजय आटाळे, राजेंद्र पाटील, नारायण बागल, सुनिता नांगरे, दिलीप शिंदे, संतोष होळ तसेच विवोचे वितरक शंकर हराळे व रणजीत सावंत हे उपस्थित होते..
पाटण तालुक्यातील अतिवृष्टीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाता-येता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, पावसापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड न पडता अध्ययन प्रकिया सुलभ व्हावी,यासाठी संस्थेकडून देणेत येणारे रेनकोट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आनंद पळसे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला..
रेनकोट वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे प्रतिनिधी रोहीत वाघळे यांनी रेनकोटच्या माध्यमातून दिलेली मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फायदेशीर असून भविष्यातही संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला..यावेळी पेडणेकर, चुनीदार यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात रेनकोटचे वितरण सर्व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते करणेत आले, तत्प्रसंगी सर्व उपस्थितांचे स्वागत केंद्रप्रमुख दिलीप शिंदे यांनी केले, बेलवडे केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री.संजय आटाळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार भोसगांव केंद्रांचे केंद्रप्रमुख श्रीमती सुनिता नांगरे यांनी मानले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा