अभिषेक पानस्कर यांची एम.टेक. या उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथे निवड.
सोनवडे:-
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपडी या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल पानस्कर सर यांचे चिरंजीव चि.अभिषेक यांची नुकतीच एम .टेक.साठी शासकीय आय.आय. टी. कॉलेज दिल्ली या ठिकाणी मेकॅनिकल डिझाईनिंग या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे.
अभिषेक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडे येथे झाले असून माध्यमिक शिक्षण शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये झाले असून २०१७साली इ.१०वी मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता.
अभिषेक यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा, युवा नेते मा.जयराज देसाई दादा आदित्यराज देसाई दादा ,संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा, मोरणा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शरद शेजवळ सर व सर्व शिक्षक वृंद,बेलवडे केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री संजय आटाळे सर, सोनवडे गावचे ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी यांनी चि.अभिषेक पानस्कर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा