अण्णा भाऊ साठे हे थोर समाजसुधारक होते – श्री. शरद शेजवळ
सोनवडे (प्रतिनिधी) – "अण्णा भाऊ साठे हे केवळ लोकशाहीर नव्हते, तर ते थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि कार्यातून दलित, वंचित आणि शोषित घटकांना आवाज दिला," असे प्रतिपादन शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ यांनी केले.
यापुढे ते म्हणाले की, "अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर समाज परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम होते. त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली." त्यांनी तरुण पिढीने अण्णा भाऊंच्या विचारांवर चालावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी भाषण, गीत सादर केले.तसेच विद्यालयातील उपशिक्षक श्री. आनंदराव जाधव सर, श्री.सुरेश भिसे यांनी आपल्या भाषणांतून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उप शिक्षिका मणेर एस.एस.मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री. संतोष कदम सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा