कोणेगाव शाळेला साउंड सिस्टिम व साहित्यांची भेट : शैक्षणिक प्रगतीस हातभार
कोणेगाव, ता. कराड – शनिवार, दि. 19 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणेगाव येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. कै. रमेश व कै. सयाजी निवृत्ती चव्हाण यांच्या स्मरणार्थ पोर्टेबल साउंड सिस्टिम शाळेला भेट देण्यात आली. ही भेट श्रीमती सुजाता रमेश चव्हाण (रा. कोणेगाव) रेक्टर, यशोदा टेक्निकल कॉलेज, सातारा यांनी दिली.
तसेच ग्रामपंचायत कोणेगाव मार्फत १५व्या वित्त आयोग निधीतून शाळेसाठी दोन जलशुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर) व अन्य उपयुक्त साहित्य देण्यात आले. या सर्व वस्तूंच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम शाळेत उत्साहात पार पडला.
या वेळी सहारा मित्र समूह फौंडेशन, कराड चे अध्यक्ष श्री. शंकर निकम, उपाध्यक्ष श्रीमती सुजाता चव्हाण, सचिव सौ. शिल्पा देशपांडे, खजिनदार सुभेदार मेजर श्री. प्रभाकर काळे, कोणेगावचे सरपंच मा. रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अजय भोपते, उपाध्यक्ष श्री. संदीप धनवे, सदस्य श्री. निवास चव्हाण व श्री. संदीप चव्हाण, मुख्याध्यापक श्री. संजय नांगरे, शिक्षक श्री. कृष्णत हिरवळे, श्री. वसंत शेडे, श्री. रशीद तांबोळी, श्रीमती हर्षा कांबळे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमांचे प्रास्ताविकपर स्वागत मुख्याध्यापक श्री. संजय नांगरे सर यांनी केले तर आभार श्री.कृष्णत हिरवळे सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा