कुंभारगाव - मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न
कुंभारगाव १६ जुलै २०२५ – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कुंभारगाव परिसरातील गरजू नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शिवसेना चांदीवली विभाग प्रमुख श्री. अशोक परशराम माटेकर व माजी नगरसेवक सौ अश्विनी अशोक माटेकर यांच्या वतीने बुधवार दिनांक १६ जुलै रोजी राबविण्यात आला.
या कार्यक्रमात सुमारे ५०० गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विशेषतः शेतकरी कामगार, महिला, तसेच वयोवृद्ध नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. तसेच चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडीवस्तीमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन छत्री वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री.दिलीप घाडगे श्री.धनाजी चाळके शेडेवाडीचे सरपंच श्री. राहुल मोरे चाळकेवाडीचे माजी उपसरपंच श्री.भरतबापू चाळके श्री.विशाल मोरे,श्री.तानाजी वरेकर ,श्री.कुणाल माने आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.दिलीप घाडगे म्हणाले, “गरजूंना मदत करण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला, तर आपल्याला हे कार्य व्यापक स्वरूपात राबवता येईल.”
उपस्थित नागरिकांनी शिवसेना चांदीवली विभाग प्रमुख श्री. अशोक परशराम माटेकर व माजी नगरसेवक सौ अश्विनी अशोक माटेकर यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा