गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

तळमावले ; स्पंदन ट्रस्ट तर्फे पोलीसांना मास्क वाटप


तळमावले/वार्ताहर
कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण जनतेला कोरोनाची लागण होवू नये यासाठी पोलीस कर्मचारी, डाॅक्टर, नर्सेस इतर प्रशासन अधिकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क वाटप करण्यात आले.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून  पाटण तालुक्यातील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट काम करत आहे. ट्रस्ट च्यावतीने नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जातात. सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या कर्तव्य भावनेतून ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गांना मास्क वाटण्यात आले.
तळमावले बाजारतळावर बंदोबस्त करणारे ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांचे सहकारी यांच्याकडे सोशल डिस्टन्स ठेवून मास्क देण्यात आले. मास्क वाटप करताना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, छायाचित्रकार अनिल देसाई, शंभूराज देसाई, पोलीस पाटील विजय सुतार, विशाल कोळेकर, संजय भुलुगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने डाॅ.संदीप डाकवे यांनी तळमावले येथील महालक्ष्मी शिवण क्लास च्या सौ.सुवर्णा देसाई यांच्याकडे मास्कचे कापड दिले. महालक्ष्मी शिवण क्लास कडून मास्क विनामूल्य देण्यात आले आहेत. याकामी त्यांना निशा देसाई व देसाई परिवारातील सदस्यांची मदत मिळाली. मास्क दिल्याबद्दल पोलीस वर्गाकडून ट्रस्टचे आभार मानन्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...