बुधवार, ८ एप्रिल, २०२०

दिलासादायक : साताऱ्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कालपर्यंत ६ वर पोहोचली आहे. ग्रामिण भागातही कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांच्या मनात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण (४५वर्षीय महिला) आता ठणठणीत बरा झाला असल्याचे वृत्त आले आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या महिलेचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ही दिलासादायक बातमी आहे.दुबईहून आलेल्या ४५ वर्षीय महिला जिल्ह्यातील पहिली कोरोना पोझिटिव्ह रुग्ण ठरली होती.

दवाखान्यात दाखल झाल्यानंतर १५ व्या दिवशी सदर रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकजणाचा इतर आजारातून मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरातून अनावश्यक कारणाकरता बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...