बुधवार, ८ एप्रिल, २०२०

पारनेर : ग्रुप "ऍडमिन'सह तिघांना अटक, फेक मेसेज फिरवला

पारनेर ः सोशल मीडियावरून कोरोनाविषयाची खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपावरून नांदूर पठार व पिंपळगाव रोठा येथील सोशल मीडियावरील एका ग्रुपच्या "ऍडमिन'सह तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली. हवालदार भालचंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती गारगुंडी, अक्कलवाडी, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा परिसरात फिरत आहे. तो जवळ येऊन बोलतो, मला पाणी द्या किंवा आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करू द्या, असे म्हणतो, अंगावर थुंकतो तरी सावध व सतर्क राहा,' असा मेसेज नांदूर पठार येथील दत्ता भाऊ फ्रेंड सर्कल या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर रविवारी (ता. ०५) रोजी टाकण्यात आला होता. त्यामुळे जनतेत भीती पसरविल्याबद्दल, तसेच अफवा पसरविली म्हणून हा मेसेज टाकणारे मनोज जगताप (रा. पिंपळगाव रोठा), किरण बोंटे व ग्रुप ऍडमिन दत्तात्रय आग्रे (दोघे रा. नांदूर पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...