धामणी येथील युवकांकडून रक्तदान शिबीराचे आयोजन
तळमावले/संदीप डाकवे
पाटण ; तालुक्यातील धामणी येथील युवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. श्री दत्त विकास मंडळ (रजि.) यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमुर्ती स्पोर्टस् क्लब, (दत्त चैक) धामणी यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. सदर रक्तदान शिबीरामध्ये सोशल डिस्टन्स व शासनाच्या इतर मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले.
रक्तदान शिबीराची सुरुवात ज्येष्ठ नागरिक ज्ञानू मारुती सावंत यांनी श्रीफळ वाढवत केली. शिबीरात धामणीतील श्रीराम मित्र मंडळ, बाळसिध्द गणेश मंडळ, गणेश मित्र मंडळ, जोतिर्लिंग मित्र मंडळ, भराडीमाता नवरात्र उत्सव मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ या मंडळातील सर्व युवकांनी तसेच ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थ मंडळ धामणी यांनीदेखील सहभाग घेवून रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशवंतराव चव्हाण ब्लड बॅंक कराड यांच्या सहकार्याने करण्यात आले.
नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या या युवकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा