सातारा ; कोरोना विषाणूचा वाढत असणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सातारा जिल्हात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातीलआत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने . किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दि. 11 एप्रिल पासून पुढील आदेश मिळेपर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील. तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा