शनिवार, ४ एप्रिल, २०२०

राज्यात 'कोरोना'चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने 'टेन्शन' वाढले

मुंबई | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तासागणिक वाढताना दिसत आहे. सद्यस्थितीला भारतात हा आकडा २००० च्या पुढे गेला असून महाराष्ट्रात हा आकडा आता ५०० च्या पुढे जात ५३७ झाला आहे. काल (३ एप्रिल) सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची देशातील संख्या ६८ वर पोहचली आहे.कोरोनाची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी गेल्या २४ तासांत देशात ८ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. दरम्यान, काल (३ एप्रिल) एका दिवसांत राज्यात ६७ रोपोना पॉझिटिव्ह झाले होते. तर आज (४ एप्रिल) ४७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यात चिंतेचे वातावरण अधिक निर्माण झाले आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...