शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपाला 'समृद्धी'च्या बैठकीत शेतकऱ्यांची पुष्टी

नाशिक : समृद्धी महामार्गातील गैरव्यवहाराबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकार विरोधात विधानसभेत केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. आता स्थानिक पातळीवरही असेच आरोप सुरू झाले आहेत. आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्गातील अडचणी संदर्भातील बैठकीत शेतकऱ्यांनी रस्त्यात नसलेली घरे रस्त्यात दाखविली गेली, तर मातीची घरे कॉंक्रिटची दाखविल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली.
समृद्धी मार्गाच्या कामाबाबत विविध मागण्या करतानाच, एका शेतकऱ्याने थेट गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने बैठक गाजली. नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अॅड. कोकाटे यांच्या मध्यस्थीतून इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातील समृद्धीबाधित गावांतील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शुक्रवारी बैठक झाली.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, समृद्धी कक्षाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, सविता पठारे, अधीक्षक अभियंता राजेश निघोट आदींसह बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी समृद्धीविषयक नाराजीचा पाऊस पाडला. दैनंदिन अडचणीशिवाय गैरव्यवहाराचे आरोप झाले.

'समृद्धी महामार्गासाठी शेतातील माती-मुरूम काढला जातो. ट्रक, डंपरच्या वाहतुकीमुळे गावोगावचे रस्ते पूर्ण खचून गेले आहेत. अद्याप रस्ता सुरू नाही तोच गावोगाव शेती गावठाण वेगळे पडले आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वळसा घालून रस्ता ओलांडून शेतात जावे लागते. ठेकेदार ऐकत नाही. दादागिरी करून शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या जातात. रस्त्यासाठी बऱ्याच ठिकाणी खदानी खोदून त्यातून प्रमाणापेक्षा जास्त गौण खनिज काढले जाते. त्यामुळे गावोगाव या खदानी यमराज झाल्या आहेत. त्या धोकादायक खदानी बुजविल्या जाव्यात, तत्पूर्वी कुंपण करून त्या बंदिस्त तरी कराव्यात,' अशा तक्रारी बैठकीत करण्यात आल्या.

बैठकीत लक्ष्मीकांत शिंदे या शेतकऱ्याने थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला पुष्टी देणारे आरोप करीत जिल्ह्यात जमीन संपादनात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला. रस्त्यात नसलेली घरे रस्त्यात दाखविली गेली. मातीची घरे कॉंक्रिटची दाखविल्याचा आरोप करीत चौकशीसाठी उपोषणाचा इशारा दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी मांढरे यांनी समस्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश देताना स्थानिक तक्रारीबाबत नियमित आढावा बैठका घेऊन पाठपुराव्याचे आश्‍वासन दिले.

समृद्धी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाचे पैसे दिले हे ठीक आहे. पण या कामामुळे गावोगावचे रस्ते खराब झाले आहेत. धुळीमुळे पिकांचे नुकसान होते आहे. रस्त्यानंतर अनेक गावांतील नागरिकांना त्यांच्या शेतावर जाता येणार नाही. दळणवळण तुटेल. त्यामुळे रस्त्याखाली अंडरपास्ट करावेत, नियमित तक्रार निवारण बैठका घ्याव्यात, असे महत्त्वाचे निर्णय झाले. -अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

उद्योजक : सर्जेराव यादव,तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री लोकराज्य समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


सांगली प्रतिनिधी ;- 

इस्लामपूर येथील लोकराज्य विद्या फाउंडेशनच्यावतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उद्योजक सर्जेराव यादव व तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना शनिवारी इस्लामपूर येथे अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते व पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, नांदेडचे प्राध्यापक शिवाजीराव गोरे, प्राध्यापक नवनीत सांगले, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, लोकराज्य फाऊंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे, शिवशाहीर प्राध्यापक अरुण घोडके, अॅड. संपतराव पाटील, एस के कुलकर्णी नगरसेवक विक्रम पाटील माजी नगरसेवक कपिल ओस्वाल संग्राम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंगेश मंत्री यांनी माझ्या गावात माझ्या माणसाकडून गौरव झाल्याने आनंद वाटतो. अण्णासाहेब डांगे यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. आमची जडण-घडण त्यांच्या तालमीत झाली. त्यांच्याच संस्कारात वाढलो. हा पुरस्कार प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अण्णासाहेब डांगे, कृष्णात पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मानसिंग ठोंबरे यांनी आभार मानले तर गोपाळ पाटसूपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील स्मशानभूमीत हा कार्यक्रम पार पडला.

सात हजार सहकारी संस्थांचा लेखापरीक्षण अहवालच नाही, राज्य सरकारकडून 'कारणे दाखवा' नोटीस

मुंबईतील सुमारे 29 हजार 894 संस्थांपैकी तब्बल 7 हजार 762 सहकारी संस्थांनी त्यांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेले नसल्याची माहिती आज विधानसभेत समोर आली. यापैकी 608 संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात दिली तर त्याचबरोबर ज्या लेखापरीक्षकांनी जाणीवपूर्वक लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे त्यांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्याचे देखील सहकारमंत्र्यानी नमूद केले आहे.

मुंबईतील सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल शासनाकडे सादर करण्याबाबत आमदार सुनील प्रभू, बालाजी किणीकर, मंगेश कुडाळकर आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.सन 2018-19 या वर्षात लेखापरीक्षणासाठी मुंबईतील एकूण 29 हजार 894 सहकारी संस्था पात्र होत्या. त्यापैकी जानेवारी 2020 अखेर एकूण 22 हजार 132 संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वारित 7 हजार 762 संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही. लेखापरीक्षण न झालेल्या मुंबईतील एकूण 7 हजार 762 संस्थांपैकी 608 संस्थांना कलम 102 अन्वये अवसायनपूर्व नोटीस देण्यात आलेली आहे, तर 3 हजार 143 संस्थांना लेखापरीक्षण करण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे यावेळी लेखी उत्तरात सांगितले आहे. उर्वरित 1 हजार 181 संस्थांची सुनावणी सुरू असून उर्वारित संस्थांवर कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी लेखी उत्तरात दिली.

यामुळे रखडले लेखापरीक्षण
लेखापरीक्षकांना लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थांकडून दफ्तर उपल्ब्ध करून न देणे, लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार्य न करणे, संस्थांचे दफ्तर अपूर्ण असणे, पत्ता न सापडणे इत्यादी कारणास्तव हे लेखापरीक्षण रखडल्याची माहिती समोर आली आहे.

खूशखबर ! MPSC च्या 806 जागांची मेगाभरती

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग "ब'च्या 806 जगांची भरती केली जाणार आहे. यामध्ये उपनिरीक्षक पदाच्या सर्वाधिक 650 पदांचा समावेश आहे.शासकीय पदांची भरती महापरीक्षा पोर्टल मधून भरती केली जात होती. यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने महापरीक्षा पोर्टल नुकतेच बंद करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही भरती "एमपीएससी'कडूनच भरती व्हावी अशी मागणी केलेली असली तरी अद्याप सरकारने याबाबत निर्णय घेतलेला नाही
त्यातच आता गृह विभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदांची भरती काढून विद्यार्थ्यांना खुष करण्याचा प्रयत्न झाला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अजारपत्रित "गट ब' साठी संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे रोजी राज्यातील 37 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची 650 पदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी 195, खेळाडूंसाठी 32 आणि अनाथांसाठी 6 पदे आरक्षीत आहेत. राज्य कर निरीक्षक पदाच्या 89 जागा भरती केल्या जाणार आहेत. त्यात 27 महिला, खेळाडूंसाठी 4 जागा आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठीच्या 67 जागांपैकी 20 महिलांसाठी तर 3 खेळाडूंसाठी आरक्षीत आहेत.

रायगडवर शिवाजी महाराज यांचा साकडे
राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्याऐवजी खासगी संस्थेकडून विभागवार भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा विरोध असून, सर्व प्रकारची भरती "एमपीएससी' या शासकीय संस्थेकडूनच झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनाच साकडे घातले आहे.

अर्जासाठी संकेतस्थळ - www.mahampsc.gov.in
अर्ज करण्याची मुदत - 28 फेब्रुवारी ते 19 मार्च 2020
परीक्षेची तारीख - 3 मे 2020

राजुरी येथे आढळले बिबट्याचे तीन बछडे

आळेफाटा : गटकळमळा परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. त्यादरम्यान मजुरांना बिबट्याचे तीन लहान बछडे आढळले. राजुरी (ता. जुन्नर) येथे आज (ता.२९) सकाळी साडेअकराच्या सुमारास या बछड्यांचे दर्शन झाले.
राजुरी येथील गटकळमळा परिसरात शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. यावेळी ऊसतोडणी मजुरांना साधारण एका महिन्याचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. याबाबत त्यांनी संबंधित शेतकऱ्यास माहिती दिली. तसेच संबंधित शेतकरी शिवाजी गटकळ यांनी याविषयी तातडीने वनविभागाला कळविले.

त्यानंतर याठिकाणी वनविभागाचे वनरक्षक जे. बी. सानप यांनी वन कर्मचाऱ्यांसह भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ऊसतोडणीही थांबविण्यात आली. बिबट्याचे बछडे अतिशय लहान असल्याने त्यांना आईच्या भेटीसाठी पुन्हा ऊसाच्या शेतात सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सानप यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नवी मुंबई;-शिवसेना नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

नवी मुंबई, 29 फेब्रुवारी : नवी मुंबईतून राजकीय क्षेत्रातली एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते , महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा )आणि मनपा विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या बातमीमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या तोंडावर अशा धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून 50 लाखांच्या खडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याचीदेखील धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवून खंडणीची धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे.या संदर्भात रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना नेत्याला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौगुले यांच्याबरोबर असलेले महिलांचे आक्षेपार्य फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून 50 लाख रूपये खंडणीची मागणी केली गेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना नेत्याला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौगुले यांच्याबरोबर असलेले महिलांचे आक्षेपार्य फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून 50 लाख रूपये खंडणीची मागणी केली गेली आहे.दरम्यान, फोटोंबाबत विचारलं असता माझे महिलांसोबत कोणतेही आक्षेपार्ह फोटो नसल्याचे स्पष्टीकरण विजय चौगुले यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर निवडणूकीच्या तोंडावर राजकीय सुडबुध्दीतून धमकीचा प्रकार घडवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पत्राद्वारे चौगुलेंना खंडणीची धमकी देण्यात आली ते पत्रदेखील पोलिसांनी तपासणीसाठी घेतलं आहे. दरम्यान, याबद्दल अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस चौगुले यांच्या कुटुंबाशी आणि कार्यकर्त्यांशी चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) ;- ते करायचे ऊसाचे नुकसान म्हणून जाळले जिवंत...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : ऊसशेतीचे नुकसान करीत असल्यामुळे गव्याची हत्या करून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकिसरे (ता.वैभववाडी) येथे घडला आहे.

या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.गेल्या काही दिवसात कोकणात प्राण्यांचे मृत्यृचे सत्र सुरु होते. यामध्ये दोन मगरी आणि गव्याचा समावेश होता. मात्र आज गव्याची हत्या करून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकिसरे येथील एका शेतकऱ्याच्या ऊसशेतीचे गव्याकडुन नुकसान होत होते.दोन दिवसांपुर्वी शेतकरी ऊसाची राखण करीत असताना दहा ते पंधरा गव्याचा कळप पुन्हा ऊसशेतीत घुसला.शेतकऱ्याने गव्याना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र गवे ऊसशेतीतुन बाहेर पडलेले नाहीत.त्यातच एक गवा शेतकऱ्याच्या दिशेने धावत आला.त्यामुळे त्या शेतकऱ्याने आपल्या ताब्यातील बुदंकीने गव्यावर गोळी झाडली.यामध्ये गव्याचा मृत्यु झाला.ही माहीती कुणाला समजु नये त्याने गव्याला ऊसशेतीनजीक जाळुन विल्हेवाट लावली.

ही माहीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली.वनविभागाचे अधिकारी गेले दोन दिवस गुप्त तपास करीत होते.अखेर शुक्रवारी रात्री उशिरा एका तर आज सकाळी एकाला वनविभागाने अटक केली.या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या कंपनीचा धुमाकूळ : अडीच हजारांत दहा लाखांचे कर्ज

सांगली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावे गंडा घालणाऱ्या दिल्लीस्थित एका कंपनीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. हजारो लोकांना एसएमएसद्वारे संदेश पाठवून त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

त्यासाठी दोन हजार सहाशे रुपयांचे करार शुल्क तातडीने भरा आणि अर्धा तासात तुमच्या बॅंक खात्यावर दहा लाख रुपये जमा केले जातील, असा "हनी ट्रॅप' त्यांनी लावण्यास सुरवात केली आहे. अद्याप या जाळ्यात किती लोक अडकले, याची माहिती समोर आली नसली तरी काही मंडळींनी याबाबत इतरांना सावध केले आहे.

मुद्रा योजनेचे कर्ज योग्य मार्गाने मिळवायचे तर किती घाम गाळावा लागतो, याची साऱ्यांनाच कल्पना आहे.एक तर तुमचा उद्योगाचा प्रस्ताव लवकर तयार होत नाही, झाला तर मंजुरीला खेटे घालावे लागतात, बॅंका दारात उभ्या करून घेत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुद्रा लोनला फारसा प्रतिसाद नसल्याचे सातत्याने समोर आले आहे.

अशावेळी याच योजनेचे नाव वापरून एका दिल्लीस्थित कंपनीने धुमाकूळ घातला आहे. या कंपनीकडून "मुद्रा लोन'बाबत संदेश आले आहेत. सोबत मोबाईल नंबर, ऑनलाईन रजिस्टर करण्याची लिंक दिली आहे. त्यावर तुमची नोंदणी केल्यानंतर तातडीने तुमची कागदपत्रे मागवून घेतली जातात. त्याआधारे कर्जाचा प्रस्ताव तयार होता आणि तासाभरात तुमचे कर्ज मंजूर झाल्याचे पत्र वॉटस्‌ऍपवर पाठवले जाते. वार्षिक दोन टक्के व्याज, सुमारे सातएक वर्षांची मुदत, कर्ज फेडीचा हप्ता, असे सारे अगदी खरे भासवले जाते. त्यानंतर सुरू होतो गंडा घालण्याचा धंदा.

कर्ज तर मंजूर झाले, पण पैसे कधी मिळणार? तर ते मिळवण्यासाठी एक कायदेशीर करार करणे आवश्‍यक असते. त्याचा शुल्क 5 हजार 200 रुपये. त्यातील निम्मे म्हणजे 2 हजार 600 रुपये ऑनलाईन बॅंक खात्यात भरायचे. त्यानंतर ही कंपनी तुमच्या शहरातील त्यांच्या कायदेशीर सल्लागाराचा संपर्क करून देणार आणि तुमचा करार होताच अर्धा तासात तुमच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा होणार, अशी स्वप्ने दाखवली जात आहेत. या जाळ्यात काही लोक फसले आहेत. काहींनी सावधपणे त्याला टोलवून लावले आहे.

नवी मुंबई ;- कोपरखैरणेत होतोय नागरिकांचा कोंडमारा

नवी मुंबई : कमी दाबाने पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी, गटारांची क्षमता संपल्याने रस्त्यावर येणारे सांडपाणी.. हे नियोजित नवी मुंबईतील कोपरखरणे या उपनगरातील चित्र असून सर्वच बाबतीत नागरिकांची 'कोंडी' होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.या विभागात इतर अनेक समस्यांबरोबर वाहतूक कोंडी ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. रेल्वे स्थानकाबाहेर एकमेव 'पे अँड पार्क'ची व्यवस्था आहे. इतर कुठेही वाहनतळ उपलब्ध नसल्याने वाहने उभी करण्याची हक्काची जागा म्हणजे रस्ते व उद्याने.

जाहिराती साठी संपर्क : व्हाट्सएप 8108253323 


त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांबरोबर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करतात. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते निमुळते होऊन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर २२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. तीनटाकी ते सेक्टर-१५ च्या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कोपरखैरणे बस स्थानक, माथाडी रुग्णालय परिसरातदेखील वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना त्रासाचे होत आहे.

या भागातील मलनि:सारण वाहिन्या तसेच सिडको वसाहतीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर आहे. सिडको वसाहतीत गरजेपोटी अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे नियोजित लोकसंख्येच्या तीन ते चारपट लोकसंख्या वाढली आहे. मात्र पायाभूत सुविधांची क्षमता तेवढीच असल्याने मलनि:सारण वाहिन्या भरून वाहत आहेत. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वसाहतीअंतर्गत विकासकामे करण्याची मागणी होत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.प्रभाग क्रमांक ४२ मध्ये सेक्टर २२, २३, १६ व १७ चा काही भाग येतो. या भागातही विजेची मोठी समस्या काही अंशी सुटलेली आहे. सेक्टर १६ येथे नवीन वीजवाहिनी जोडणी करण्यात आली आहे. मलनि:सारण वाहिन्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कामे सुरू झाली आहेत. प्रभाग क्रमांक ४३ मध्ये सेक्टर १७, १८ हा भाग येतो. या वसाहतीत कंडोनियमअंतर्गत कामे रखडली आहेत. रस्त्याची कामे लवकरच सुरू होतील, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

विविध समस्यांनी श्वास कोंडलेल्या कोपरखरणेतील नागरिकांना श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे ते निसर्ग उद्यान. या ठिकाणी नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असून येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त होत आहे. सकाळ, संध्याकाळ या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते.


एपीएमसीवर कोणाचे वर्चस्व?आज मतदान २ मार्च ला निकाल

नवी मुंबई : राज्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी शनिवार, २९ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या 'मविआ'चे या शिखर समितीवर अप्रत्यक्ष वर्चस्व राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे. तुर्भे येथील पाच बाजार समितीपैकी एका बाजाराच्या व माथाडी कामगारांच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. हे दोन्ही संचालक हे 'मविआ'च्या घटक पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचे दिसून येते.

राज्यात एकूण ३०५ छोटय़ा मोठय़ा बाजार समित्या आहेत. त्यात एपीएमसी तगडी बाजार समिती आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या संचालक मंडळाची गेली दहा वर्षे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे शासनाने त्यावर प्रशासक नेमला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिल्याने 'एपीएमसी'च्या १८ संचालक पदांसाठी शनिवारी मतदान होत आहे. एकूण २४ संचालक पदापैकी सहा संचालक हे राज्य शासनाकडून नाम निर्देशित केले जाणार आहेत. १८ संचालक हे मतदान प्रक्रियेद्वारे निवडून येणार आहेत. यात सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी आणि तुर्भे येथील पाच घाऊक बाजारांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. या पाच बाजारात शेतमालाची चढउतार करणारे हमाल माथाडी तोलारी यांच्यामधून एक प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केला जाणार आहे.

पाच बाजारापैकी फळ बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर माथाडी संचालक म्हणून माजी मंत्री शशिकांत यांचीही बिनविरोध निवड यापूर्वीच जाहीर झालेली आहे. शिंदे पानसरे हे दोन्ही संचालक 'मविआ'तील घटक पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे तुर्भे येथील चार घाऊक बाजारातून शनिवारी चार संचालकांची निवड केली जाणार आहे. या बाजारातील फळ बाजारातून संजय पानसरे यांना सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एकमताने निवडून दिले आहे, तर शिंदे हे संचालक मंडळात हवे असल्याने त्यांनाही एकमताने सर्व माथाडी संघटनांनी निवड केली आहे. त्यामुळे आता धान्य बाजारात निलेश वीरा विरुद्ध पोपटलाल भंडारी तर मसाला बाजारात कीर्ती राणा यांना अशोक जैन हे टक्कर देणार आहेत. कांदा-बटाटा बाजारातही यावेळी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

माजी संचालक अशोक वाळुंज यांना गेली अनेक वर्षे या बाजारात तळ ठोकून असलेल्या राजेंद्र शेळके यांचा सामना करणार आहेत. भाजी बाजारात बिनविरोध निवडीला विरोध करणारे र्मचट बँकेचे अध्यक्ष डी. मोरे यांनी माजी संचालक शंकर पिंगळे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यात धान्य व मसाला बाजार हे भाजप समर्थक व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे निवडून येणारे संचालक हे भाजप वा सरकारला आपले म्हणणारे असणार आहेत, मात्र भाजी, कांदा, आणि फळ या तीन बाजारपेठांवर मविआचे विशेषत: राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. सहा महसूल विभागांतून प्रत्येकी दोन असे १२ संचालक एपीएमसीत येणार आहे. यातही काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात बलाढय़ घाऊक बाजार समितीवर यावेळी मविआचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

S S C परीक्षा मंगळवार पासून, कोल्हापूर विभागात एकूण एक लाख ४१ हजार परीक्षार्थी

,कोल्हापूर प्रतिनिधी :-
 दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे आॅनलाईन पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. उत्तरपत्रिका आणि आवश्यक स्टेशनरी साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेले स्मार्टवॉच (घड्याळ), पेन वापरण्यास बंदी असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी शुक्रवारी सांगितले.

'हेल्पलाईन'

दहावीच्या परीक्षार्थींसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंडळातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची हेल्पलाईनसाठी नियुक्ती केली आहे.

यामध्ये विभागीय सचिव एस. एम. आवारी (९४२३४६२४१४), सहसचिव डी. बी. कुलाळ (७५८८६३६३०१), साहाय्यक सचिव एस. एस. सावंत (८००७५९७०७१), वरिष्ठ अधीक्षक पी. एच. धराडे (९८५००२०७९०), एस. एल. हावळ (९८९०७७२२२९), एस. एस. कारंडे (९८६००१४३५६), आदींचा समावेश आहे. हेल्पलाईन दि. २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

धक्कादायक ;- काळगाव येथे बिबट्याला हुसकावण्यासाठी लावली जंगलाला आग

काळगाव ता.पाटण,सातारा | 
बिबट्याची मानवी वस्तीत वाढलेली वरदळ रोखण्यासाठी सातारा येथील दोन व्यक्तींनी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. दिसतोय म्हणून त्याला हुसकावण्यासाठी वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोघांना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. काळगाव (ता. पाटण) विभागातील कोळगेवाडीजवळच्या वनहद्दीत गुरुवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी पत्रकारांना सांगितले.काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगेवाडीतील वनकक्ष क्रमांक ६२५ मध्ये गुरुवारी दुपारी बाळाराम हरी कोळेकर (वय ६५) आणि सीताराम बंडू बोळावे (वय ६८) यांना वणवा लावताना वनकर्मचाऱ्यांनी पाहिले व त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले.
या वेळी लागलेला वणवा कर्मचाऱ्यांनी विझवला. याच वनक्षेत्रात १७ व १८ फेब्रुवारीलाही वणवा लागलेला होता. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी त्या वेळीही शर्थीचे प्रयत्न करून तो विजवला होता.
जाहिरात;-
आज घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे विचारणा केली असता या परिसरात बिबट्या दिसतोय म्हणून राहिलेले क्षेत्र जाळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गवतात टाकून दिलेली काडीपेटीही आणून दिली. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६,१(ब) (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशीस व न्यायालयात हजर राहण्याची हमी बंध पत्रावर घेऊन त्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एस. राऊत, डी. डी. बोडके, जयवंत बेंद्रे, अमृत पन्हाळे, वनरक्षक विशाल डुबल, सुभाष पाटील, सुरेश सुतार, वनकर्मचारी मुबारक मुल्ला, वसंत मोरे आदींनी हा वणवा विजवण्यासाठी सहकार्य केले.

आपला विद्यार्थी मोठा व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते प्रा:सचिन पुजारी

वनकुसवडे ता पाटण - दि.२८ 
पद्मावती माध्यमिक विद्यालय,सन २०१९-२०२० एस .एस .सी  शुभचिंचतन कार्यक्रमच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे प्रा. सचिन पुजारी (के सी कॉलेज तळमावले) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की
शालेय जीवन हे दिशा देणारे संस्कार केंद्र आहे.या केंद्रामधून मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम होत असते.१० वी हा त्यातील अखेरचा टप्पा.यानंतर विद्यार्थी हा परिपक्व होऊन कॉलेज जीवनात प्रवेश करत असतो.परंतु शाळेत मिळालेले संस्कार आणि ज्ञान हे आयुष्याभर उपयोगी पडत असतात.त्यामुळे आपण यानंतर कोठेही गेला तरी शाळेला विसरु नका.पालक,शिक्षक यांनी तुमच्या यशासाठी परिश्रम घेतले आहेत.त्यां अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी आहे. आपला विद्यार्थी मोठा व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते.ही इच्छा आपण पूर्ण कराल,असा विश्‍वास व्यक्त करुन आज जागतिक मराठी भाषा दिन असल्याने आपल्या या भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगून आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करावा. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष -मा जगन्नाथ शेळके सर (सरपंच , ग्रामपंचायत कोटी ता पाटण) मा श्री कांबळे एस एस  (मुख्याध्यापक, पद्मावती माध्यमिक विद्यालय,वनकुसवडे)मा.जावेद डांगे (सर) होते.या कार्यक्रमात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


तळमावले,ता.पाटण;-महिलांसाठी खुली मतदान प्रक्रिया घ्या निवेदनाद्वारे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पाटण : तळमाावले (ता. पाटण) येथे दारूबंदी झालेली मतदान प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. महिलांना घाबरविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर शंभर एक लोक दारूविक्रेत्यांनी आणून ठेवले होते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच महिलांसाठी खुली मतदान प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणी येथील महिला व सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास महिला दिनी आठ मार्चला सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या वेळी दिलेल्या निवेदनात महिलांनी म्हटले, की आडव्या बाटलीसाठी काल झालेल्या मतदानात आडव्या बाटलीसाठी 282, तर उभ्या बाटलीसाठी 38 मतदान झाले, तर 23 मते बाद ठरविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान महिलांना मतदान करता येत नव्हते. कोतवालच महिलांच्या हातून चिठ्ठ्या घेऊन स्वत: बॉक्‍समध्ये टाकत होते. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. दारूबंदी मतदानाबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन पाटण तहसीलदार कार्यालयाकडून झाले नाही.ग्रामपंचायतीला दिलेली मतपत्रिका व मतदान प्रक्रियेवेळी वापरलेली मतपत्रिका यात फेरबदल करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राबाहेर दारूविक्रेत्यांनी शंभर लोक सोबत आणून महिलांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. येथील महिलांनी संघर्ष करून 282 मतदान मिळविले असून, अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, 
तसेच दारूबंदीसाठी पुन्हा खुली मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
या निवेदनावर कविता कचरे यांच्यासह सुमन ताईगडे, मालन ताईगडे, सीमा ताईगडे, विमल लकडे, सुजाता ताईगडे, मनीषा ताईगडे,भारती ताईगडे, रूपाली ताईगडे, विमल ताईगडे, छाया काटकर, छाया ताईगडे,सुनीता भुलूगडे, तारूबाई ताईगडे, वनिता ताईगडे, प्रियांका ताईगडे, यांनी सह्या केल्या आहेत

"मिशन २०२२ मुंबई महानगरपालिका";-राष्ट्रवादी काँग्रेसची तयारीला सुरुवात

मुंबईत मागील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबबळावर मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डमध्ये उमेदवारांची तयारी केली जाणार आहे. आघाडी होणार आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाची तयारी ठेवली आहे. संघटना मजबूत केली जाईल. वार्डनिहाय संघटना बांधली जाणार आहे. पक्षाचे सेल आहेत. त्यांच्या वॉर्ड निहाय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सत्तेत आल्यावर आता सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळायला हवे. त्यासाठी वॉर्डनिहाय पक्ष संघटनेची बांधणी करणार असल्याची आणि तसे आदेश दिले असल्याची माहिती सुद्धा मलिक यांनी दिली.


त्याचबरोबर १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादीने चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात कार्यकर्ता मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. शिबिरात पक्षाचे पैसे भरुन रजिस्टर केलेले ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीची सुरुवात या शिबिरातून करणार आहोत. ‘मिशन २०२२ मुंबई महानगरपालिका’ असे असणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. सकाळी या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतील. तर, संध्याकाळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शिवाय या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे अनेक मंत्री उपस्थित राहतील.अशीही माहिती मिळते आहे.

नवी मुंबई: लोकल पकडताना नवऱ्यासोबत ताटातुट झालेल्या महिलेवर 2 तासांमध्ये 3 जणांकडून बलात्कार

नवी मुंबई 27 फेब्रुवारी : वाट चुकलेल्या असहाय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन तासांमध्ये या पीडित महिलेवर दोन वेळा बलात्कार झाला. यात तीन व्यक्तिंचा सहभाग होता असं आता पुढे आलंय. 19 वर्षीच्या महिलेची नवऱ्यासोबत ताटातुट झाली होती. या महिलेला रेल्वे स्टेशनजवळ सोडण्याचा बहाणा करुन दोन घटनांमध्ये तिच्यावर तीघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नाशिक मध्ये राहणारी पीडित महिला घाटकोपर येथे पतीसह गेली होती. लोकल पकडताना त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर हा सगळ्या घटनाक्रम घडला.

लोकल पकडताना पतीसोबत ताटातुट झाल्यानंतर ही महिला रात्री मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरली.पुढील प्रवास कसा करायचा असा तिच्यासमोर प्रश्न होता. आणि हातात पैसे ही नसल्याने या महिलेने आपले कानातील सोन्याचे दागिने मुंब्रा येथे विकण्याचा प्रयत्न केला. कोणीच ते दागिने विकत घेण्यास तयार नसल्याने तिने एका रिक्षाचालकला विनंती केली. मात्र त्या नराधमाने महापे येथिल निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला आणि दागिने विकून पैसे आणतो सांगून पळून गेला.

आपले दागिनेही गेले आणि पैसेही मिळाले नाही म्हणून या महिलेने पुन्हा स्कुटी वरून जाणाऱ्या दोघांना जवळच्या रेल्वे स्थानकात सोडण्याची विनंती केली. मात्र या दोघांनी घणसोली रेल्वे स्थानकावर सोडण्या ऐवजी हायवे लगतच्या झाडीत नेऊन बलात्कार केला. अखेर या महिलेने घणसोली रेल्वे स्थानक गाठलं आणि इतर प्रवाशांच्या मदतीने ती ठाणे मार्गे नाशिक मधील आपल्या घरी पोहचली.झालेला सर्व प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पीडित महिलेच्या सांगण्यावरून ऑटो रिक्षामधील दोन बाहुल्या आणि दोन झेंड्यांच्या ओळखी वरून तिघाही नराधमांना 24 तासात मुद्देमालासह अटक केलीय. पोलीस पुढील तपास करत आहेत.

माथाडी कामगारांच्या नावाने उद्योगांना लुबाडणाऱ्या बोगस टोळ्यांविरुद्ध कडक कारवाई : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी : 
माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला वडाळा व चेंबूर येथे शासनाकडून मिळालेल्या जमिनीवरील गृहप्रकल्पातील सदस्यांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, मंडळाच्या कार्यालयीन सेवेत पदभरती करताना माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, माथाडी कामगार मंडळाची पुनर्रचना तातडीने व्हावी तसेच माथाडी कामगारांच्या नावाने उद्योगांना लुबाडणाऱ्या बोगस टोळ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, आदी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधानभवनात आज झालेल्या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री व माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील आदींसह वरिष्ठ शासकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनीयनचे पदाधिकारी, माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर माथाडी कामगार मंडळाची तसेच सल्लागार समितीची पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित आहे. महामंडळ व समितीवर कामगार संघटनांना योग्य प्रतिनिधीत्वं देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले.

माथाडी कामगारांसाठी वडाळा व चेंबूर येथे साधारणपणे चार हजार घरांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यातील सभासदांची पात्रता प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. कामगारांच्या मुलांना मंडळाच्या कार्यालयीन सेवेत प्राधान्य देण्यात यावे, माथाडी हॉस्पिटलचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, माथाडी कायद्यातील त्रूटी दूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील रस्ते व अन्य आवश्यक सुविधा सिडकोच्या माध्यमातून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले.

माथाडी मंडळाच्या नावाने बोगस व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून व्यापारी व उद्योगांची सुरु असलेली छळवणूक थांबवण्यासाठी कठोर पोलिसी कारवाई करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. यासाठी कामगार नोंदणी व कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे नियम कठोर करण्यात येणार आहेत. माथाडी कामगारांनी पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मंडळामार्फत भरण्याची प्रक्रिया पुर्ववत करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाणार आहे. बाजार समितीच्या परवानाधारक मापाडी व तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भातील सर्व संबंधितांची पुन्हा एकदा बैठक घेऊन करण्यात येणार आहे.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

नवी मुंबई ;- खारघर भुखंड घोटाळा प्रकरण: जमीन सरकारजमा करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी मुंबईतील प्रतिनिधी ;-
खारघर भुखंड प्रकरणी 1700 कोटींचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन भाजपला विरोधकांकडून अडचणीत आणण्यात आले होते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप ही लावण्यात आला होता. सिडकोच्या जमिनीची किंमत 1767 कोटी रुपये असून ती फक्त तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. खारघर भुखंड घोटाळा प्रकरणातील जमीन सरकारजमा करण्याचा आदेश रायगडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात काढला होता. पण आता जमीन खरेदी केलेल्या मनीषा भतिजा यांनी त्या आदेशाला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी पनवेल मधील मौजे येथील काही कुटुंबियांना जागा वाटप करण्यात आली होती. पण 26 फेब्रुवारी 2018 मध्ये ही जमीन मे महिन्यातच मनिष भतीजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रायगडच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना 24 एकर जमिनीचे वाटप करण्यापूर्वीच त्याचे खरेदीपत्र झाल्याचा दावा केला होता. तसेच बिल्डरने संगनमत करुन नवी मुंबईतील जमीनी विकत घेतल्याचे ही त्यांनी म्हटले होते.तसेच खारघर भुखंड घोटाळाप्रकरणी जर एकनाथ खडसे यांच्यावर जमीन व्यवहाराचा आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. तर या घोटाळ्याचा चौकशीवर प्रभाव पडू नये म्हणू मुख्यमंत्र्यांनी पदावरुन दूर व्हावे अशी मागणी राधा-कृष्ण विखे पाटील यांनी केली होती.

धक्कादायक ;- वीस पेक्षा कमी पट असलेल्या 305 शाळा बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई प्रतिनिधी ;- 
राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता लवकरच बंद होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील जवळजवळ 305 शाळा बंद होणार असल्याने शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. यापूर्वी सुद्धा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हाच निर्णय घेतला होता. पण त्यावेळी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता. तर शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी पर्यंत बालकांच्या वस्तीलगत एक किमी पर्यंत शाळा उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे.तसेच शाळा स्थापन करण्यासाठी कमीतकमी 20 बालकांचा समावेश असावा. या शाळेत 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असण्यासोबत त्यांना वाहतूक भत्ता आणि अन्य सुविधा सुद्धा द्यावात असा ही नियम आहे.पण आता 20 पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळा बंद होणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

यावर आता विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सध्याचे सरकार हे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याचे काम करत आहे. तर कपिल सिब्बल यांनी शाळा बंद करुन वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचे निर्देशन दिले होते. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाळा चालवायला डोक लागत अशी टीका केली होती. तर आता तुमच्या सरकारला शाळा बंद करण्याची अक्कल कोणी दिली असा प्रश्न विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी राज्यातील प्रादेशिक भाषांमधील शाळांना 100 अनुदान मिळावी अशी शाळा कृती समितीची मागणी आहे. राज्य सरकारने या गोष्टीसाठी आश्वासन दिले आहे मात्र अजूनही मंत्रिमंडळाची त्याला मंजुरी मिळाली नाही. अशाप्रकारे शिक्षण विभाग आणि वित्त विभाग मुद्दाम यासाठी टाळाटाळ करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे होते. तसेच शिक्षकांना शाळा बंद आंदोलन सुद्धा पुकारण्याचा इशारा दिला होता.

नर्सरी, पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट 15 दिवसांनी शिथील, मुख्याध्यापकांना विशेषाधिकार; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

महाराष्ट्र शासन पत्र

दरम्यान, राज्यभरातील शाळा आणि पालकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे शाळांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकारने नर्सरी प्रवेशाची अट शिथिल करण्याऐवजी नर्सरीचे प्रवेश वयाच्या चौथ्या वर्षांपासून करण्यात यावे. जेणेकरून मुलांवर लहान वयातच अभ्यासाचा ताण पडणार नाही. तसेच, वयाची अट शिथिल करण्याऐवजी सरकारने नर्सरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. याकडेही रेडीज यांनी लक्ष वेधले.

नर्सरी प्रवेशावरुन पालक आणि शाळाचालक, संस्थाचालक यांच्यात होत असलेल्या वादावर राज्य सरकारने दिलासादायक तोडगा काढला आहे. नर्सरी (Nursery) प्रवेशासाठीची वयोमर्यादा 15 दिवसांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जाहीर केला. नर्सरी प्रवेशासाठी बालकाच्या वयाची 3 वर्षे पूर्ण तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. परंतू, ही तीन वर्षे 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झालेली असावीत असा नियम होता. या नियमामुळे 30 सप्टेंबर नंतरच्या एक दोन आठवड्यात जन्माला आलेल्या बालकाचे पालक आणि संस्थाचालक आणि शाळाचालक यांच्यात कडाक्याचे वाद होत असत.

वयोमर्यादेच्या नियमामुळे बालकाचे एक वर्ष हाकनाक वाया जाते असा पालकांचे म्हणने असे.

नगर जिल्ह्यातील 36 गावांना दूषित पाणीपुरवठा

अहमदनगर सर्वांना शुध्द पाणी मिळावे यासाठी सरकार कोट्यवधींचा खर्च करत असताना दुसरीकडे शंभर टक्‍के गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली असता या महिन्यात 36 गावांतील 63 पाणी नमूने दूषित असल्याचे आढळले आहेत. वर्षभरात हा आकडा 1125 चा होता.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमूने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आहेत त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने 20 हजार 382 गावांतील पाणी नमुन्यांची तापाणी केली.त्यात 1125 गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्त्रोतांचे पाणी दूषित आढळले,तेथे पाणी शुध्दीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. मात्र, दर महिन्यात नवनव्या गावांमध्ये दूषित पाणी आढळणे सुरूच राहिले. पाण्यातील क्‍लोरीन सरासरी 33 टक्‍के असावे, असा नियम आहे. या महिन्यात 241 नमुने तपासण्यात आले. यात 13 ठिकाणी निकृष्ट नमुने आढळले. यात सर्वाधिक राहुरीत सहा, तर अकोले तालुक्‍यात 3 व पारनेरमध्ये दोन निकृष्ट नमुने आढळले. पाथर्डी व नेवासा तालुक्‍यातही एक-एक निकृष्ट नमुने आढळले. या तेरा ठिकाणी 20 टक्‍के पेक्षा कमी क्‍लोरीन पाण्यात आहे.

दूषित पाणी नमुने (कंसात तपासलेले नमुने)
पारनेर : 9 (112), अकोले : 3 (175), नगर : 7 (120), संगमनेर : 9 (179), शेवगाव : 0 (44), पाथर्डी : 1(84), राहुरी : 9 (96), श्रीगोंदे : 2(133), कोपरगाव : 4 (90), कर्जत : 13(40), नेवासे : 0 (25), राहाता : 2 (63), श्रीरामपूर : 4(70), जामखेडः 0 (74).

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
पारनेर- रूईछत्रपती, अळकुटी, खडकवाडी, वासुंदे .अकोले- लाडगाव, आंबेवंगन, टीटवी .नगर- चास, टाकळी काझी, देवगाव .संगमनेर- कौठेकमळश्‍वर, घुलेवाडी, लोहारे, मीरपूर .पाथर्डी- निपाणीजळगाव .राहुरी- बारागावनांदूर, टाकळीमिया .श्रीगोंदा- कोळगाव . कोपरगाव- गोधेगाव, बोलकी, संवत्सर. कर्जत- बजरंगवाडी, वालवड, कारेगाव, पींपळवाडी, पोटरेवस्ती, कोंभळी, कोकणगाव, थेरगाव, निमगाव गांगर्डा. राहाता- तीसगाव मोठेबाबानगर, एकरूख बोरावकेवस्ती . श्रीरामपूर- भोकर, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान.

पहाटेच्या शपथविधीवर बोलू नका, देवेंद्र फडणवीस यांची अजित दादांना विनंती

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका रात्री घडामोडी घडवून पहाटे शपथ घेतल्याचा मुद्दा आज हलक्याफुलक्या स्वरुपात विधानसभेत चर्चिला गेला.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका रात्री घडामोडी घडवून पहाटे शपथ घेतल्याचा मुद्दा आज हलक्याफुलक्या स्वरुपात विधानसभेत चर्चिला गेला. आझाद मैदानात मराठा समाजातील मुलांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुलांना न्याय देण्याची मागणी करत, अजित दादा ऑन द स्पॉट निर्णय घेतात, जसं त्यांनी रात्री ठरवलं आणि सकाळी शपथ घेतली, याची आठवण चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांना करून दिली.

उत्तराच्या शेवटी चंद्रकांत पाटील यांच्या शपथविधीच्या मुद्याला अजित पवार प्रत्त्युत्तर देणार इतक्यात समोरच्या बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवलं.

देवेंद्र फडणवीस खाली बसूनच अजित पवारांना म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. अशा पद्धतीने पहाटेच्या शपथविधी मागचा इतिहास पुन्हा एकदा गुलदस्त्यातच राहिला.


'दिशा' कायदा नेमका काय आहे ? जाणून घ्या

राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मात्र हा दिशा कायदा नक्की काय आहे ? ते आपण जाणून घेणार आहोत.
१).आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये १३ डिसेंबर रोजी 'दिशा विधेयक' पारित केलं

२).बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली आहे.

३) या काद्यामुळे बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे.

४) महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह जाळण्याची घटना डिसेंबर महिन्यामध्ये हैदराबादमध्ये घडली होती. या घटनेचे देशभर पडसाद उमटले. यानंतर आंध्र प्रदेशने या कायद्यासाठी वेगाने पावले उचलली. दिशा विधेयकाला आंध्र प्रदेश क्रिमिनल लॉ (सुधारणा) कायदा २०१९ म्हटले आहे.

५) या कायद्याअंतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या अपराधाची सुनावणी जलद करत, २१ दिवसांच्या आत निकाल लावण्याची आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

६) बलात्काराच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर २१ दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करून आरोप व गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याप्रकरणी तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी "कराड जवळचे हे" गाव घेतले दत्तक

कराड;-
कराड डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गावाला यापुर्वी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. यापूर्वी केवळ पांढरेपाणी गावाच्या विकासाच्या चर्चाच झाल्या आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता मंजूर करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी यांनी केली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या पांढरेपाणी (ता.पाटण) येथील गावपोहोच रस्त्याचे भूमिपूजन झाले. शंभूराज देसाईंनी 1 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे. शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार करण्यात आला. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथूराम कुंभार,शिवदौलत बँकेचे दगडू शेळके, भागोजी शेळके, किसन गालवे, गणेश भिसे, रमेश गालवे, आटोलीचे सरपंच सावळाराम शेळके, उपसरपंच भिमराव जगताप, राम पवार, लक्ष्मण शेळके, दिनकर शिंदे, बंडू चाळके, दिनकर कोळेकर, आनंदा मोहिते उपस्थित होते.

शंभूराज देसाई म्हणाले, 2014 आणि 2019 च्या निवडणूकीमध्ये 100 टक्के मतदान करीत गावातील गावकऱ्यांनी एकही मत विरोधात जावू दिले नाही. मतदारसंघात मताच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस या गावाने मिळविले आणि आत्ताही मिळवले आहे. आगामी आर्थिक वर्षात उर्वरीत कामांना आवश्यक निधी मंजूर करुन देण्यासाठी कटिबध्द असून एक मंत्री म्हणून या गावांच्या विकासाकरीता हे गाव दत्तक घेत आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय यंत्रणेकडील आवश्यक योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या गावाला आवश्यक असणारी विविध विकासकामे पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. भूमिपुजन कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार केला. आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला पाठबळ देणाऱ्या देसाई कुटुंबांच्या पाठीशीच ठाम उभे असल्याचे ग्रामस्थांनी शंभूराजे देसाईंना सांगितले.

तळमावले ;- बाटली आडवी झालीच नाहीं! महिलांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व्यर्थ.

ढेबेवाडी (ता.पाटण) ;- 
तळमावले, येथील महिलांनी तब्बल वर्षापासून उभारलेला आणि कायम धगधगत ठेवलेला दारूबंदीचा लढा अखेर अयशस्वी झाला. "बाटली'चे भवितव्य ठरविण्यासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत आडव्या बाटलीला 282, तर उभ्या बाटलीला फक्त 38 मते मिळाली, तरीही एकूण 608 पैकी निम्म्याच्यावर म्हणजे 305 मतांचा टप्पा गाठण्यात आंदोलनकर्त्या कमी पडल्याने आडव्या बाटलीला जास्त मते मिळूनही उभी बाटलीच जिंकली. या प्रक्रियेत 23 मते अवैध ठरली. या निकालाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली नाही.
तळमावलेतील सीताई समूहाच्या अध्यक्षा कविता कचरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी महिला दिनी सुरू झालेला महिलांचा दारूबंदीसाठीचा लढा मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत पोचण्यास वर्षभराचा कालावधी गेला.
दरम्यानच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन वेळा महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यात आली. तिसरी पडताळणी यशस्वी ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.26) मतदान झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानासाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली. आडव्या बाटलीसाठी यादीतील 608 महिला मतदारांपैकी 305 मतदान अपेक्षित होते. स्थानिक पोलिसांसह "उत्पादन शुल्क'च्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मतदान केंद्राला गराडा होता. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सोबत घेऊन महिला मतदानासाठी केंद्रावर दाखल होत होत्या. मतपत्रिकेवर स्वाक्षरी व अंगठा घेतल्यानंतर उभ्या किंवा आडव्या बाटलीचा पर्याय निवडून त्यावर शिक्का मारून मतपत्रिका पेटीत जात होत्या. स्थानिक रहिवासी महिलांसह नोकरी व उद्योगानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या कुटुंबातील महिलाही मतदानासाठी आवर्जून गावी आल्या होत्या.
निवासी तहसीलदार प्रशांत थोरात, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, "उत्पादन शुल्क'चे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक पी. ए. बोडेकर, शिरीष जंगम, प्रियांका भोसले आदी आधिकारी सकाळपासून मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार समीर यादव यांनी काम पाहिले. विभागातील मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेत साहाय्य केले. सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल ऐकण्यासाठी आंदोलनकर्त्या महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. मतदानाचा अधिकृत निकाल जाहीर झाला नाही. मात्र, आडव्या बाटलीसाठी अपेक्षित मतांचा टप्पा गाठण्यात महिला कमी पडल्याने बाटली उभीच राहिल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच निकालाची अधिकृत घोषणा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतपत्रिकेवर दारू दुकानांची नावेही छापलेली होती. मतदानापूर्वी काही दिवस अगोदर आंदोलनकर्त्यांना मिळालेल्या मतपत्रिकेच्या नमुन्यावर पहिल्या क्रमांकाला आडव्या बाटलीचे, तर दुसऱ्या क्रमांकावर उभ्या बाटलीचे चिन्ह छापलेले होते. मात्र, प्रत्यक्षात आज मतपत्रिकेवर ही दोन्ही चिन्हे उलट क्रमाने छापलेली आढळल्याने नमुना पत्रिकेनुसार प्रचार व जागृती केलेल्या आंदोलकांची ऐन वेळी तारांबळ झाली. बदललेला क्रम आपल्या महिला सहकाऱ्यांना सांगण्यासाठी त्यांची धडपड सुरू दिसली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आक्षेपही घेतला. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने योग्य ठिकाणी दाद मागू, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुल मुलीं जातात तेव्हा.पोलीसही चक्रावले

नाशिक ; त्र्यंबकेश्‍वर येथील पाटील गल्लीत लॉज आहे. मंगळवारी या ठिकाणी दोन अल्पवयीन मुले-मुली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
 त्यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तेथे छापा टाकला. संबंधित मुला-मुलींनी शालेय गणवेश घातलेला असल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांच्या पालकांनाही बोलावून घेण्यात आले. मुला-मुलींचे कारनामे पाहून संबंधितांच्या पालकांना पोलिस ठाण्यातच रडू कोसळले. अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
त्र्यंबकेश्‍वरमधील पाटील गल्ली येथील लॉजमधून मंगळवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुला-मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्र्यंबक पोलिस ठाण्यात संबंधित मुले-मुली तसेच त्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन सोडून देण्यात आले. अल्पवयीनांना अशा प्रकारे लॉज उपलब्ध करून देणाऱ्या लॉजमालकावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

नगर ;- जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांतील भूजल पातळी वाढली


नगर - जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदीत हे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीगोंदा व जामखेड तालुक्‍यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याच्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत एका वर्षात किमान जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्‍टोबर अशा महिन्यांमध्ये घेतल्या जातात. त्यानुसार जानेवारी महिन्यातील भूजल पातळी मोजण्याचे कामही पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अकोले, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव व श्रीरामपूर या बारा तालुक्‍यांमध्ये भूजल पातळीत समाधानकारक वाढ दिसून
येत आहे.अकोले तालुक्‍याची पाणीपातळी 0.28 मीटरने,कर्जतची 1.41, कोपरगाव 0.90, नगर 1.93,नेवासा 1.26, पारनेर 1.51, पाथर्डी 1.55, राहाता 1.95, राहुरी 1.17, संगमनेर 1.22,शेवगाव 1.57 तर,श्रीरामपूर तालुक्‍याची पाणीपातळी 1.44 मीटरने वाढली आहे. दरम्यान, सध्याची भूजल पातळीची परिस्थिती पाहता जिल्ह्यात येत्या 31 मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

ताळमावले :- उभी बाटली आढवी होणार का? आज मतदान

दारूबंदीसाठी आज मतदान

तळमावले ता.पाटण
ग्रामपंचायत ताईगडेवाडी (तळमावले) येथील शासनमान्य दारू दुकाने आणि बिअर बार बंद करावेत, या मागणीसाठी तेथील महिलांनी काही महिन्यांपासून आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तेथील कविता कचरे यांनी याप्रश्नी महिलांना एकत्र करून मोर्चा काढून लढ्याचे रणशिंग फुंकले होते. मा.जिल्हाधिकारी  यांच्याकडे त्यांनी त्या वेळी केलेल्या यासंदर्भातील मागणीनुसार दारूबंदीच्या निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली. अशा प्रक्रियेत 25 टक्‍क्‍याच्यावर स्वाक्षऱ्यांची पडताळणी आवश्‍यक असते 
पहिल्या पडताळणीवेळी 15.98 तर दुसऱ्या वेळी 23 टक्के महिलांची उपस्थिती असल्याने तिसऱ्यांदा आलेल्या महिलांच्या अर्जानुसार पुन्हा स्वाक्षऱ्यांची पडताळणी झाली. अर्जावर स्वाक्षरी केलेल्या 286 पैकी 178 महिलांनी त्यास हजेरी लावली होती त्यानुसार आज पुन्हा ग्रामसभा होवून मतदान होणार आहे .ह्या वेळी सर्व महिलांनी एकजूट करून बाटली आडवी करण्याचा निर्धार केला आहे.
आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात. यापैकी निम्मे अपघात दारू प्यायल्याने होतात. तसेच व्यसनाधीनतेने आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७६७२ व्यसनींनी आत्महत्या केल्या. हे सर्व बघता दारूबंदी ही महाराष्ट्रात केवळ नैतिक किंवा भाबडेपणाची मागणी नाही तर अपघात, गुन्हे, आत्महत्या, महिला अत्याचार व दारिद्रय़ यांतून सुटका करण्यासाठी गरजेची आहे
अवैध दारू रोखण्यासाठी गावोगावी ग्रामसंरक्षक दल उभारण्याची मागणी होत आहे. याचे कारण आज परवानाधारक दुकानांतून खेडय़ापाडय़ांत अवैध दारू विविध वाहनांतून पाठवली जाते आणि हॉटेल, दुकाने वा घरांतून विकली जाते. या दारूचा खेडय़ातील ग्राहक हा गरीब मजूर वर्ग असतो. दारूमुळे कार्यक्षमता कमी झालेले मजूर कामालाही जात नाही उलट कष्ट करणाऱ्या पत्नीची मजुरी हिसकावून घेतात. मारहाण करतात. पैसे दिले नाही तर घरातील वस्तू विकून दारू पितात.

एकीकडे १४व्या वित्त आयोगाने इतका प्रचंड निधी खेडय़ात जाताना, बचत गट, अन्नसुरक्षा देताना कुटुंबात होणारी बचत ही दारू काढून घेत पुन्हा अनेक कुटुंबांना दारिद्रय़ात ढकलते आहे हे कटू वास्तव आज खेडय़ापाडय़ात दिसते. त्यामुळे आज गावागावांतील अवैध दारू कशी रोखायची हा महत्त्वाचा ग्रामीण प्रश्न झाला आहे. किमान ती रोखली गेली तरी प्रश्न वैध दारूचा फक्त काही गावांपुरता सीमित होईल (याचे कारण देशी दारूचे लायसन्स तुलनेत कमी असून नवीन दिले जात नाहीत).


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

ढेबेवाडी ;- 27 लाखांच्या कामाच्या बदल्यात ठेकेदाराला दोन लाख 70 हजार रूपयांची मागणीचा संवाद व्हायरल

पाटण : तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यांच्याविरोधात काही लोकांनी चुकीचा संदेश समाज माध्यमातून पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या व सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता सतीश कचरे यांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पो. नि. उत्तमराव भजनावळे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

 दरम्यान, साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामाच्या बदल्यात ठेकेदाराला दोन लाख 70 हजार रूपयांची मागणीचा कचरे यांचा ठेकेदाराशी झालेला संवाद व्हायरल झाल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
रविवारी (ता.23) समाज माध्यमांमधून महिला सामाजिक कार्यकर्त्या व ठेकेदार यांच्यातील संवाद व्हायरल झाला. या संवादात साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून कामाच्या किंमतीच्या दहा टक्के म्हणजे दोन लाख 70 हजार रूपयांची मागणी संबंधित महिला करीत आहे. संबंधित साकव पूलाचे काम कसे मंजूर आणले. त्यासाठी किती खस्ता खालल्या. लोकप्रतिनिधींची मर्जी राखण्यासाठी काय काय केले हे सर्व त्या संवादातून ठेकेदारास सांगत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्याला देखील त्या खडेबोल सुनावत आहेत. त्यांचा हा संवाद आता सर्वत्र घुमू लागल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान हा संवाद जाणिवपुर्वक पसरविला जात असल्याची माहिती खूद्द संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज देऊन स्पष्ट केले आहे.याबाबत सिताई फौंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे यांनी ढेबेवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून आम्ही दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यावर उद्या (बुधवारी) निर्णय होणार आहे. मात्र, काही लोकांनी माझ्याविषयी चुकीचा संदेश सोशल मिडियावर पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून हे कोणी पसरविले आहे त्याचा शोध लावून सहकार्य करावे. तसेच माझी बदनामी करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करावी. गणेश यादव नावाने संदेश पसरविला आहे. हा तक्रार अर्ज ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याकडे कचरे यांनी दिला आहे.

पाटणमध्ये संघर्ष संपणार ;-देसाई-पाटणकर मैत्रिपर्वाची हवा?

पाटण तालुक्‍याचे राजकारण नेहमीच देसाई-पाटणकर या दोन गटांभोवती फिरत आहे. राजकारणासाठीचा दोन्ही गटांचा संघर्ष तालुक्‍यातील जनतेने अनेकवेळा अनुभवला आहे.अनेक वेळा विकासाच्या मुद्यावर राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकमेकांचे पुतळे जाळण्याचा प्रकारही तालुक्‍यात झाला होता. त्यामुळे सध्या दोन्ही गटांचे पक्ष सरकारमध्ये असल्याने तालुक्‍यात दोन्ही गटातील सत्ता संघर्षाची धार बोथट होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या सभेत सभापती राजाभाऊ शेलार यांनी यावर शिक्कामोर्तब केला.सध्या आपला भाजपा एकमेव शत्रू आहे. आपल्यातील संघर्ष कमी करून गट-तट वाढवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असा निरोप नेत्यांचा असल्याची कबुली सभागृहात शेलार यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेस असे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. याचा परिणाम पाटण तालुक्‍याच्या राजकारणावर होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. येथील पंचायत समितीच्या सभेत आघाडीचा धर्म पाळण्याचा नेत्यांचा निरोप सभापतींना आल्याने पाटण तालुक्‍यात देसाई-पाटणकर मैत्रीपर्वाचे वारे वाहणार का? याबाबत जनेतेत उत्सुकता आहे.तालुक्‍याच्या राजकारणात दोन्ही गटांची भूमिका महत्वाची आहे. विकास कामांच्या बाबतीत तालुक्‍यातील अपूर्ण असलेली धरणांची कामे प्रकल्प औद्योगिकरणाची समस्या, शहराचे विस्तारीकरण ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दे धक्का ;- सरपंच निवडणूक ग्रामपंचायतीतूनच, राज्यपालांच्या नकारानंतर विधेयक मंजूर!

ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक थेट लोकांमधून न करता ग्रामपंचायत सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यासंदर्भातला अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करून पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणेच निवडणुका होतील, असं जाहीर केलं होतं. मात्र, त्या सगळ्यावर राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारने मात केली असून त्यासंदर्भातलं सरपंच थेट निवडणूक बिल राज्यसरकारने विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर केलं आहे. या विधेयकानुसार आता ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक थेट लोकांमधून न होता ग्रामपंचायत सदस्यांकडूनच केली जाणार आहे.

राज्यातल्या एकूण १९ जिल्ह्यांमधल्या १ हजार ५७० ग्रामपंचायतींसाठी येत्या २९ मार्च रोजी मतदान होणार होतं. त्यासंदर्भातली अधिकृत घोषणा देखील राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्याची रीतसर मतमोजणी ३० मार्च रोजी होणार होती. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारने आधीच निर्णय घेत ग्रामपंचायत सरपंचांची निवडणूक थेट लोकांमधून न होता ग्रामपंचायत सदस्यांमार्फत केली जाईल, असं जाहीर केलं. मात्र, याला विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. विशेषत: यासंदर्भातल्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही करायला नकार दिला होता. हा प्रकार लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे, अशी टीका देखील या निर्णयावर केली जाऊ लागली होती.

राज्य सरकारनं दिली मात!

दरम्यान, यासंदर्भात सरकार अडचणीत येणार असं वाटत असताना राज्य सरकारने थेट विधानसभेत आणि विधानपरिषदेत विधेयक मांडून बहुमताच्या जोरावर ते मंजूर करून घेतलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द होणार असून सरपंचांची निवड थेट नागरिकांकडून न होता ग्रामपंचायत सदस्यांकडूनच केली जाणार आहे.


अखेर सरपंचच जनतेतून निवडणार

राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. या निवडणुकीची मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होऊन निकाल जाहीर केले जातील.

राज्य सरकारने थेट सरपंच निवड रद्द केली आहे. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाने आधीच्या निर्णयानुसार सरपंचपदासाठी थेट निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रमपंचायत निवडणुकीसाठी ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

भावकीतले भांडणं मिटवा ; ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात

मुंबई : राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 13, रायगड- 1, रत्नागिरी- 8, नाशिक- 102, जळगाव- 2, अहमनगर- 2, नंदुरबार- 38, पुणे- 6, सातारा- 2, कोल्हापूर- 4, औरंगाबाद- 7, नांदेड- 100, अमरावती- 526, अकोला- 1, यवतमाळ- 461, बुलडाणा- 1, नागपूर- 1, वर्धा- 3 आणि गडचिरोली- 296. एकूण- 1570.

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.

काळगाव ता.पाटण ;- विजेचे खांब कोसळले; आठ जण बचावले

ढेबेवाडी (ता.पाटण)
: सडलेला लोखंडी ताण अचानक तुटल्याने प्रवाहित वाहिन्यांसह विजेचे दोन खांब कोसळल्याची घटना नुकतीच धनगरवाडा (काळगाव, ता. पाटण) येथे घडली. यावेळी प्रसंगावधान राखून बालकासह आठ जण आणि काही जनावरे सुदैवाने बाजूला पळाल्याने बचावली. वीज वाहिन्या तुटून खाली पडल्यानंतर तेथे गवत व झुडपांनी पेट घेतला होता. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ त्यावर नियंत्रण मिळविल्याने आग वनहद्दीत घुसता-घुसता वाचली. मोठे नुकसानही टळले.याबाबतची माहिती अशी, काळगावपासून सुमारे सात किलोमीटरवर डोंगरात वसलेल्या धनगरवाड्यापासून जवळच असलेल्या शिवारात पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळून गेलेले विजेचे दोन खांब अचानक कोसळले.
खांबांना दिलेला लोखंडी ताण जमिनीजवळ सडलेला होता. जवळच चरायला सोडलेल्या म्हशीने त्याला अंग घासल्याने तो तुटला आणि दोन्ही खांब कोसळले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी तेथे जनावरे चरण्यासाठी घेवून आलेल्या दोन महिला, त्यांच्यासोबत असलेले एक बालक आणि पाइपलाइनसाठी खोदाई करणारे तीन कामगार तेथे होते. वनरक्षक विशाल डुबल व वसंत मोरे त्यावेळी तेथूनच वनक्षेत्रात निघाले होते. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण घाबरून गेले होते. या घटनेची माहिती तातडीने वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने तेथे येवून वीजपुरवठा बंद केला. वनकर्मचारी मुबारक मुल्ला हेही लगेच घटनास्थळी आले. विजेच्या प्रवाहित वाहिन्या वाळलेल्या गवतात आणि झुडपात पडल्याने स्पार्किंग होवून ठिणग्या पडून गवताने पेट घेतला होता. तेथून काही अंतरावरच वनहद्द असल्याने वनकर्मचाऱ्यांनी हिरव्या फांद्यांच्या साह्याने आग विझवली व जंगल तसेच अन्य मालकी क्षेत्र आगीपासून वाचवले.

कुंभारगाव ता.पाटण ;- वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पाटण : तालुक्यातील कुंभारगाव मान्याचीवाडी येथे समाजसेवक मा.चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री भैरवनाथ गणेश मंडळ व ग्रामस्थ मंडळ चाळकेवडी यांच्या सहकार्याने कुंभारगाव परिसरातील सुमारे 250 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
डॉ.दिलीप चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमला सुरवात झाली.
 याप्रसंगी डॉ. दिलीप चव्हाण, सुभाष बावडेकर,अमित शेटे,सुरेश पवार, पांडुरंग जाधव, विशाल चाळके, रघुनाथ माटेकर,राहुल पेंढारकर दिनेश मोळावडे,दिलीप घाडगे,भरत चाळके,
सौ. नंदाताई चाळके, सरपंच चाळकेवाडी इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गुढेकर यांनी केले व  संजय सावंत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



मनसेचा वर्धापन दिन यंदा नवी मुंबईत

मुंबई ;- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता १४ व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. पण यावर्षी वर्धापन दिन जरी दरवर्षी प्रमाणे असला तरी यंदाचा वर्धापन दिन हा नवी मुंबईत साजरा करण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत असून, तशी अंतर्गत चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे. नवी मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे वर्धापन दिन नवी मुंबईमध्ये साजरा करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे

झेंड्याचा रंग बदलल्या नंतर पहिलाच वर्धापन

दरम्यान, मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा झाल्यानंतर मनसेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.तसेच यंदा मनसेचा १४ वा वर्धापन दिन असून, हिंदुत्वाचा नवा विचार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जे काही राजकीय नाट्य घडले त्याच्यावर मी सविस्तर बोलेन असे सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरे मनसेचा वर्धापन दिनी काय राजकीय चिडफाड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता मनसेचे कार्यक्रम मुंबई बाहेरही होणार

विशेष बाब म्हणजे, जसे मनसेचे कार्यक्रम हे नेहमी मुंबईमध्ये होत असतात तसेच कार्यक्रम आता महाराष्ट्रातील इतर भागात देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर मराठी भाषा दिन कार्यक्रम हा ठाण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

कर्जमाफीची दुसरी यादी 28 तारखेला जाहीर केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच सरकार पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.दरम्यान, ठाकरे सरकारच्या योजना उघड्या डोळ्यांनी विरोधी पक्षांनी बघाव्या, असा चिमटा देखील उद्धव यांनी यावेळी भाजपला काढला.

पिंपरखेड (ता. शिरूर) ; दयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

टाकळी हाजी -पोलीस सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद हरिश्‍चंद्र ढोमे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दयानंद ढोमे यांना दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर येथे उत्कृष्ट सेवा करून आतापर्यंत त्यांना 621 पदके मिळाली आहेत.
तसेच राज्यस्तरीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व विविध पुरस्कार मिळाले आहेत. तंटामुक्ती अभियान उत्कृष्टरित्या सातारा येथे राबविल्याने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.गुन्हे अन्वेषण विभाग, दारूबंदी, विविध गुन्ह्यांचा तपास, तंटामुक्ती, कायदा सुव्यवस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पदक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील व पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल उपस्थित होते.याप्रसंगी सौ. मंदाताई रामदास बोंबे सरपंच ग्रामपंचायत पिंपरखेड, ग्रामस्थ आणि समाजसेवक श्री रामदासशेठ बोंबे यांनी श्री ढोमे साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भोर नसरापूर ;- प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे हाल आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून सेविका गायब

नसरापूर - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयास कुलूप असल्याने नाहक त्रास सहन करत खासगी रुग्णवाहिका करून भोर रुग्णालयात जावे लागले. या वेळी कामावर असताना आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा मागितला असून, निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.
माळेगाव (ता. भोर) येथील कविता काशिनाथ खडाखडे या महिलेस रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना नसरापूर प्राथमिक केंद्रात आणले. मात्र, आरोग्य केंद्रास कुलूप लावलेले होते. त्या वेळी कामावर असलेल्या आरोग्य सेविका विद्या हेम्बाडे या कुलूप लावून घरी निघून गेल्या होत्या.

नातेवाइकांनी त्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे भोर ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. आरोग्य केंद्रास चक्क कुलूप ठोकून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेबद्दल नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुनाना शेलार यांनी केली आहे.

याबाबत रुग्ण महिलेचे भाऊ दौलत कोळी यांनी सांगितले की, त्या दिवशी दुपारीच आम्ही माझ्या गर्भवती बहिणीस नसरापूर आरोग्य केंद्रात आणले होते. त्या वेळी सोनोग्राफीसाठी भोरला पाठविण्यात आले. भोर येथे उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी केल्यावर आम्हाला प्रसूतीसाठी अजून दोन दिवस वेळ असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही घरी परतलो. मात्र, रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास बहिणीस प्रसूतिवेदना होऊ लागल्याने आम्ही तातडीने नसरापूर आरोग्य केंद्रात नेले. तिथे आरोग्य केंद्रास कुलूप होते व आमची दखल घेतली नाही. शेवटी खासगी रुग्णवाहिकेने भोर उपजिल्हा रुग्णालयात जावे लागले.


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

उद्योजक सर्जेराव यादव,तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना मानाचा अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण‘ पुरस्कार घोषित

इस्लामपूर /प्रतिनिधी

येथील लोकराज्य विद्या फाँडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण‘ पुरस्कार उद्योजक सर्जेराव यादव व तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना घोषित केले आहेत

शनिवार दि२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे व राज्याचे माजी मंत्रीजेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फौडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.

शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सांगली रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरमधील सार्वजनिक स्मशानभूमीत हा समारंभ होणार आहेफौंडेशनने गेल्या दोन वर्षात स्मशानभूमींची स्वच्छता करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून अंधश्रध्दा निर्मूलनाचेही काम केले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी आभगवानराव साळुखेनगराध्यक्ष निशिकांत पाटील,पक्षप्रतोद विक्रम पाटीलनगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवारपोतदारसंजय पाटीलढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेहा समारंभ यशस्वीतेसाठी फाँडशनचे अध्यक्ष सुवर्णा कोळेकरउपाध्यक्ष मानसिंग ठोंबरेसदस्य आशा तांदळे यांच्यासह अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

धामणीत बिबट्या हाय. मुक्कामी

ढेबेवाडी - धामणी (ता. पाटण) येथे भरवस्तीत बिबट्याचा संचार वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.

विशेष म्हणजे बिबट्यासोबत एक बछडा असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. बिबट्या लोकवस्तीत आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तेंव्हा एक बिबट्या त्या परिसरात वावरत होता. तो ये-जा करणाऱ्या वाहन चालक व दुचाकीस्वारांना दिसत होता. त्यामुळे वाहनधारक रात्रीच्या सुमारास त्या मार्गावरून जीव मुठीत धरुन प्रवास करत होते. तेंव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोरच भरवस्तीत रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे बछड्यासह दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी प्रकाश महाजन यांच्या भरवस्तीतील घरासमोर पुन्हा त्याचे दर्शन झाले. बिबट्याचे लोकवस्तीत वारंवार दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

येथील अजय सावंत हे आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना रस्त्यात त्यांच्या गाडीसमोरच बिबट्या उभा राहिला. ते थांबले तेंव्हा बिबट्याने गुरगुरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तो निघून गेला. यामुळे विभागात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची कल्पना ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यात आता गवा रेड्यांचा कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडूनही पंचनामे करण्यापलीकडे उपाययोजना झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सभापती संगीता पुजारी यांनी केली आहे.


*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...