त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांबरोबर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करतात. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते निमुळते होऊन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर २२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. तीनटाकी ते सेक्टर-१५ च्या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कोपरखैरणे बस स्थानक, माथाडी रुग्णालय परिसरातदेखील वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना त्रासाचे होत आहे.
या भागातील मलनि:सारण वाहिन्या तसेच सिडको वसाहतीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर आहे. सिडको वसाहतीत गरजेपोटी अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे नियोजित लोकसंख्येच्या तीन ते चारपट लोकसंख्या वाढली आहे. मात्र पायाभूत सुविधांची क्षमता तेवढीच असल्याने मलनि:सारण वाहिन्या भरून वाहत आहेत. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वसाहतीअंतर्गत विकासकामे करण्याची मागणी होत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.प्रभाग क्रमांक ४२ मध्ये सेक्टर २२, २३, १६ व १७ चा काही भाग येतो. या भागातही विजेची मोठी समस्या काही अंशी सुटलेली आहे. सेक्टर १६ येथे नवीन वीजवाहिनी जोडणी करण्यात आली आहे. मलनि:सारण वाहिन्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कामे सुरू झाली आहेत. प्रभाग क्रमांक ४३ मध्ये सेक्टर १७, १८ हा भाग येतो. या वसाहतीत कंडोनियमअंतर्गत कामे रखडली आहेत. रस्त्याची कामे लवकरच सुरू होतील, असे पालिका प्रशासनाने सांगितले.
विविध समस्यांनी श्वास कोंडलेल्या कोपरखरणेतील नागरिकांना श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे ते निसर्ग उद्यान. या ठिकाणी नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असून येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त होत आहे. सकाळ, संध्याकाळ या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा