गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

नगर ;- जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांतील भूजल पातळी वाढली


नगर - जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदीत हे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीगोंदा व जामखेड तालुक्‍यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याच्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत एका वर्षात किमान जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्‍टोबर अशा महिन्यांमध्ये घेतल्या जातात. त्यानुसार जानेवारी महिन्यातील भूजल पातळी मोजण्याचे कामही पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अकोले, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव व श्रीरामपूर या बारा तालुक्‍यांमध्ये भूजल पातळीत समाधानकारक वाढ दिसून
येत आहे.अकोले तालुक्‍याची पाणीपातळी 0.28 मीटरने,कर्जतची 1.41, कोपरगाव 0.90, नगर 1.93,नेवासा 1.26, पारनेर 1.51, पाथर्डी 1.55, राहाता 1.95, राहुरी 1.17, संगमनेर 1.22,शेवगाव 1.57 तर,श्रीरामपूर तालुक्‍याची पाणीपातळी 1.44 मीटरने वाढली आहे. दरम्यान, सध्याची भूजल पातळीची परिस्थिती पाहता जिल्ह्यात येत्या 31 मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...