राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेस असे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. याचा परिणाम पाटण तालुक्याच्या राजकारणावर होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. येथील पंचायत समितीच्या सभेत आघाडीचा धर्म पाळण्याचा नेत्यांचा निरोप सभापतींना आल्याने पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर मैत्रीपर्वाचे वारे वाहणार का? याबाबत जनेतेत उत्सुकता आहे.तालुक्याच्या राजकारणात दोन्ही गटांची भूमिका महत्वाची आहे. विकास कामांच्या बाबतीत तालुक्यातील अपूर्ण असलेली धरणांची कामे प्रकल्प औद्योगिकरणाची समस्या, शहराचे विस्तारीकरण ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
पाटणमध्ये संघर्ष संपणार ;-देसाई-पाटणकर मैत्रिपर्वाची हवा?
पाटण तालुक्याचे राजकारण नेहमीच देसाई-पाटणकर या दोन गटांभोवती फिरत आहे. राजकारणासाठीचा दोन्ही गटांचा संघर्ष तालुक्यातील जनतेने अनेकवेळा अनुभवला आहे.अनेक वेळा विकासाच्या मुद्यावर राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकमेकांचे पुतळे जाळण्याचा प्रकारही तालुक्यात झाला होता. त्यामुळे सध्या दोन्ही गटांचे पक्ष सरकारमध्ये असल्याने तालुक्यात दोन्ही गटातील सत्ता संघर्षाची धार बोथट होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या सभेत सभापती राजाभाऊ शेलार यांनी यावर शिक्कामोर्तब केला.सध्या आपला भाजपा एकमेव शत्रू आहे. आपल्यातील संघर्ष कमी करून गट-तट वाढवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असा निरोप नेत्यांचा असल्याची कबुली सभागृहात शेलार यांनी दिली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा