मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

ढेबेवाडी ;- 27 लाखांच्या कामाच्या बदल्यात ठेकेदाराला दोन लाख 70 हजार रूपयांची मागणीचा संवाद व्हायरल

पाटण : तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यांच्याविरोधात काही लोकांनी चुकीचा संदेश समाज माध्यमातून पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या व सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता सतीश कचरे यांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पो. नि. उत्तमराव भजनावळे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

 दरम्यान, साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामाच्या बदल्यात ठेकेदाराला दोन लाख 70 हजार रूपयांची मागणीचा कचरे यांचा ठेकेदाराशी झालेला संवाद व्हायरल झाल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
रविवारी (ता.23) समाज माध्यमांमधून महिला सामाजिक कार्यकर्त्या व ठेकेदार यांच्यातील संवाद व्हायरल झाला. या संवादात साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून कामाच्या किंमतीच्या दहा टक्के म्हणजे दोन लाख 70 हजार रूपयांची मागणी संबंधित महिला करीत आहे. संबंधित साकव पूलाचे काम कसे मंजूर आणले. त्यासाठी किती खस्ता खालल्या. लोकप्रतिनिधींची मर्जी राखण्यासाठी काय काय केले हे सर्व त्या संवादातून ठेकेदारास सांगत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्याला देखील त्या खडेबोल सुनावत आहेत. त्यांचा हा संवाद आता सर्वत्र घुमू लागल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान हा संवाद जाणिवपुर्वक पसरविला जात असल्याची माहिती खूद्द संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज देऊन स्पष्ट केले आहे.याबाबत सिताई फौंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे यांनी ढेबेवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून आम्ही दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यावर उद्या (बुधवारी) निर्णय होणार आहे. मात्र, काही लोकांनी माझ्याविषयी चुकीचा संदेश सोशल मिडियावर पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून हे कोणी पसरविले आहे त्याचा शोध लावून सहकार्य करावे. तसेच माझी बदनामी करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करावी. गणेश यादव नावाने संदेश पसरविला आहे. हा तक्रार अर्ज ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याकडे कचरे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...