सांगली प्रतिनिधी ;-
इस्लामपूर येथील लोकराज्य विद्या फाउंडेशनच्यावतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उद्योजक सर्जेराव यादव व तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना शनिवारी इस्लामपूर येथे अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते व पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, नांदेडचे प्राध्यापक शिवाजीराव गोरे, प्राध्यापक नवनीत सांगले, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, लोकराज्य फाऊंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे, शिवशाहीर प्राध्यापक अरुण घोडके, अॅड. संपतराव पाटील, एस के कुलकर्णी नगरसेवक विक्रम पाटील माजी नगरसेवक कपिल ओस्वाल संग्राम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगेश मंत्री यांनी माझ्या गावात माझ्या माणसाकडून गौरव झाल्याने आनंद वाटतो. अण्णासाहेब डांगे यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. आमची जडण-घडण त्यांच्या तालमीत झाली. त्यांच्याच संस्कारात वाढलो. हा पुरस्कार प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अण्णासाहेब डांगे, कृष्णात पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मानसिंग ठोंबरे यांनी आभार मानले तर गोपाळ पाटसूपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील स्मशानभूमीत हा कार्यक्रम पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा