गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

नगर जिल्ह्यातील 36 गावांना दूषित पाणीपुरवठा

अहमदनगर सर्वांना शुध्द पाणी मिळावे यासाठी सरकार कोट्यवधींचा खर्च करत असताना दुसरीकडे शंभर टक्‍के गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली असता या महिन्यात 36 गावांतील 63 पाणी नमूने दूषित असल्याचे आढळले आहेत. वर्षभरात हा आकडा 1125 चा होता.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमूने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आहेत त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने 20 हजार 382 गावांतील पाणी नमुन्यांची तापाणी केली.त्यात 1125 गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्त्रोतांचे पाणी दूषित आढळले,तेथे पाणी शुध्दीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. मात्र, दर महिन्यात नवनव्या गावांमध्ये दूषित पाणी आढळणे सुरूच राहिले. पाण्यातील क्‍लोरीन सरासरी 33 टक्‍के असावे, असा नियम आहे. या महिन्यात 241 नमुने तपासण्यात आले. यात 13 ठिकाणी निकृष्ट नमुने आढळले. यात सर्वाधिक राहुरीत सहा, तर अकोले तालुक्‍यात 3 व पारनेरमध्ये दोन निकृष्ट नमुने आढळले. पाथर्डी व नेवासा तालुक्‍यातही एक-एक निकृष्ट नमुने आढळले. या तेरा ठिकाणी 20 टक्‍के पेक्षा कमी क्‍लोरीन पाण्यात आहे.

दूषित पाणी नमुने (कंसात तपासलेले नमुने)
पारनेर : 9 (112), अकोले : 3 (175), नगर : 7 (120), संगमनेर : 9 (179), शेवगाव : 0 (44), पाथर्डी : 1(84), राहुरी : 9 (96), श्रीगोंदे : 2(133), कोपरगाव : 4 (90), कर्जत : 13(40), नेवासे : 0 (25), राहाता : 2 (63), श्रीरामपूर : 4(70), जामखेडः 0 (74).

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
पारनेर- रूईछत्रपती, अळकुटी, खडकवाडी, वासुंदे .अकोले- लाडगाव, आंबेवंगन, टीटवी .नगर- चास, टाकळी काझी, देवगाव .संगमनेर- कौठेकमळश्‍वर, घुलेवाडी, लोहारे, मीरपूर .पाथर्डी- निपाणीजळगाव .राहुरी- बारागावनांदूर, टाकळीमिया .श्रीगोंदा- कोळगाव . कोपरगाव- गोधेगाव, बोलकी, संवत्सर. कर्जत- बजरंगवाडी, वालवड, कारेगाव, पींपळवाडी, पोटरेवस्ती, कोंभळी, कोकणगाव, थेरगाव, निमगाव गांगर्डा. राहाता- तीसगाव मोठेबाबानगर, एकरूख बोरावकेवस्ती . श्रीरामपूर- भोकर, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...