वैभववाडी (सिंधुदुर्ग) : ऊसशेतीचे नुकसान करीत असल्यामुळे गव्याची हत्या करून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकिसरे (ता.वैभववाडी) येथे घडला आहे.
या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.गेल्या काही दिवसात कोकणात प्राण्यांचे मृत्यृचे सत्र सुरु होते. यामध्ये दोन मगरी आणि गव्याचा समावेश होता. मात्र आज गव्याची हत्या करून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकिसरे येथील एका शेतकऱ्याच्या ऊसशेतीचे गव्याकडुन नुकसान होत होते.दोन दिवसांपुर्वी शेतकरी ऊसाची राखण करीत असताना दहा ते पंधरा गव्याचा कळप पुन्हा ऊसशेतीत घुसला.शेतकऱ्याने गव्याना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र गवे ऊसशेतीतुन बाहेर पडलेले नाहीत.त्यातच एक गवा शेतकऱ्याच्या दिशेने धावत आला.त्यामुळे त्या शेतकऱ्याने आपल्या ताब्यातील बुदंकीने गव्यावर गोळी झाडली.यामध्ये गव्याचा मृत्यु झाला.ही माहीती कुणाला समजु नये त्याने गव्याला ऊसशेतीनजीक जाळुन विल्हेवाट लावली.
ही माहीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली.वनविभागाचे अधिकारी गेले दोन दिवस गुप्त तपास करीत होते.अखेर शुक्रवारी रात्री उशिरा एका तर आज सकाळी एकाला वनविभागाने अटक केली.या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा