राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. या निवडणुकीची मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होऊन निकाल जाहीर केले जातील.
राज्य सरकारने थेट सरपंच निवड रद्द केली आहे. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाने आधीच्या निर्णयानुसार सरपंचपदासाठी थेट निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रमपंचायत निवडणुकीसाठी ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा