दरम्यान, या मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास महिला दिनी आठ मार्चला सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या वेळी दिलेल्या निवेदनात महिलांनी म्हटले, की आडव्या बाटलीसाठी काल झालेल्या मतदानात आडव्या बाटलीसाठी 282, तर उभ्या बाटलीसाठी 38 मतदान झाले, तर 23 मते बाद ठरविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान महिलांना मतदान करता येत नव्हते. कोतवालच महिलांच्या हातून चिठ्ठ्या घेऊन स्वत: बॉक्समध्ये टाकत होते. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. दारूबंदी मतदानाबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन पाटण तहसीलदार कार्यालयाकडून झाले नाही.ग्रामपंचायतीला दिलेली मतपत्रिका व मतदान प्रक्रियेवेळी वापरलेली मतपत्रिका यात फेरबदल करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राबाहेर दारूविक्रेत्यांनी शंभर लोक सोबत आणून महिलांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. येथील महिलांनी संघर्ष करून 282 मतदान मिळविले असून, अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे,
या निवेदनावर कविता कचरे यांच्यासह सुमन ताईगडे, मालन ताईगडे, सीमा ताईगडे, विमल लकडे, सुजाता ताईगडे, मनीषा ताईगडे,भारती ताईगडे, रूपाली ताईगडे, विमल ताईगडे, छाया काटकर, छाया ताईगडे,सुनीता भुलूगडे, तारूबाई ताईगडे, वनिता ताईगडे, प्रियांका ताईगडे, यांनी सह्या केल्या आहेत
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
तळमावले,ता.पाटण;-महिलांसाठी खुली मतदान प्रक्रिया घ्या निवेदनाद्वारे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पाटण : तळमाावले (ता. पाटण) येथे दारूबंदी झालेली मतदान प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. महिलांना घाबरविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर शंभर एक लोक दारूविक्रेत्यांनी आणून ठेवले होते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच महिलांसाठी खुली मतदान प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणी येथील महिला व सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा