पद्मावती माध्यमिक विद्यालय,सन २०१९-२०२० एस .एस .सी शुभचिंचतन कार्यक्रमच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे प्रा. सचिन पुजारी (के सी कॉलेज तळमावले) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की
शालेय जीवन हे दिशा देणारे संस्कार केंद्र आहे.या केंद्रामधून मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम होत असते.१० वी हा त्यातील अखेरचा टप्पा.यानंतर विद्यार्थी हा परिपक्व होऊन कॉलेज जीवनात प्रवेश करत असतो.परंतु शाळेत मिळालेले संस्कार आणि ज्ञान हे आयुष्याभर उपयोगी पडत असतात.त्यामुळे आपण यानंतर कोठेही गेला तरी शाळेला विसरु नका.पालक,शिक्षक यांनी तुमच्या यशासाठी परिश्रम घेतले आहेत.त्यां अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी आहे. आपला विद्यार्थी मोठा व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते.ही इच्छा आपण पूर्ण कराल,असा विश्वास व्यक्त करुन आज जागतिक मराठी भाषा दिन असल्याने आपल्या या भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगून आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करावा.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष -मा जगन्नाथ शेळके सर (सरपंच , ग्रामपंचायत कोटी ता पाटण) मा श्री कांबळे एस एस (मुख्याध्यापक, पद्मावती माध्यमिक विद्यालय,वनकुसवडे)मा.जावेद डांगे (सर) होते.या कार्यक्रमात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा