मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळायला हवे. त्यासाठी वॉर्डनिहाय पक्ष संघटनेची बांधणी करणार असल्याची आणि तसे आदेश दिले असल्याची माहिती सुद्धा मलिक यांनी दिली.
त्याचबरोबर १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादीने चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात कार्यकर्ता मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. शिबिरात पक्षाचे पैसे भरुन रजिस्टर केलेले ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीची सुरुवात या शिबिरातून करणार आहोत. ‘मिशन २०२२ मुंबई महानगरपालिका’ असे असणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. सकाळी या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतील. तर, संध्याकाळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शिवाय या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे अनेक मंत्री उपस्थित राहतील.अशीही माहिती मिळते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा