शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

खूशखबर ! MPSC च्या 806 जागांची मेगाभरती

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग "ब'च्या 806 जगांची भरती केली जाणार आहे. यामध्ये उपनिरीक्षक पदाच्या सर्वाधिक 650 पदांचा समावेश आहे.शासकीय पदांची भरती महापरीक्षा पोर्टल मधून भरती केली जात होती. यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने महापरीक्षा पोर्टल नुकतेच बंद करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही भरती "एमपीएससी'कडूनच भरती व्हावी अशी मागणी केलेली असली तरी अद्याप सरकारने याबाबत निर्णय घेतलेला नाही
त्यातच आता गृह विभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदांची भरती काढून विद्यार्थ्यांना खुष करण्याचा प्रयत्न झाला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अजारपत्रित "गट ब' साठी संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे रोजी राज्यातील 37 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची 650 पदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी 195, खेळाडूंसाठी 32 आणि अनाथांसाठी 6 पदे आरक्षीत आहेत. राज्य कर निरीक्षक पदाच्या 89 जागा भरती केल्या जाणार आहेत. त्यात 27 महिला, खेळाडूंसाठी 4 जागा आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठीच्या 67 जागांपैकी 20 महिलांसाठी तर 3 खेळाडूंसाठी आरक्षीत आहेत.

रायगडवर शिवाजी महाराज यांचा साकडे
राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्याऐवजी खासगी संस्थेकडून विभागवार भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा विरोध असून, सर्व प्रकारची भरती "एमपीएससी' या शासकीय संस्थेकडूनच झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनाच साकडे घातले आहे.

अर्जासाठी संकेतस्थळ - www.mahampsc.gov.in
अर्ज करण्याची मुदत - 28 फेब्रुवारी ते 19 मार्च 2020
परीक्षेची तारीख - 3 मे 2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...