संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०
कराड : निबंध स्पर्धेत शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्रा. सुरेश रघुनाथ यादव यांनी पटकवला द्वितीय क्रमांक
पाटण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पाटण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत पाटण पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सचिन आनंदा भिसे (वय 32, रा. नाटोशी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. नोव्हेंबर 2019 मध्ये व 26 जानेवारी 2020 रोजी संशयित भिसेने मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे. त्याची फिर्याद मुलीने दिली आहे. त्यावरून पोस्को कायद्याने भिसेवर गुन्हा नोंद आहे. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे तपास करीत आहेत.
जी एस महानगर बँकेच्या नूतन अध्यक्षांना अण्णा हजारे यांच्या कडून शुभेच्छा !
पारनेर ; नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी ओळख
विकासाकडे वाटचाल
आठ हजार लोकसंख्येच्या वनकुटे गावात सुमारे चाळीस टक्के कुटुंबे आदिवासी आहेत. गावविकासाच्या आराखड्यासह सर्व निर्णय ग्रामसभेत घेतले जातात. गावात सरपंच वृक्ष दत्तक योजना राबवली जाते. गावपरिसरात खडकाळ भाग अधिक आहे. त्यामुळे खडक फोडून वड, पिंपळ, चिंच झाडे लावावी लागतात. प्रति झाड साधारण पाच हजार रुपये खर्च येतो. गावात वाढदिवस, पुण्यस्मरण, दशक्रिया विधी, लग्न यासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एक झाडाच्या लागवडीसाठी अकराशे रुपये लोकसहभाग दिला जातो. उर्वरित रक्कम ग्रामपंचायत खर्च करते.
या उपक्रमातील ठळक बाबी
- सुमारे पाच लाख रुपये खर्च करून सुमारे शंभर झाडांची लागवड व जोपासना
- खडकावर दोनशे झाडे लावण्याचा गावकऱ्यांचा संकल्प
- गावशिवारात वनविभागाचे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र. त्यावरही लोकसहभाग, वनविभागाच्या मदतीने चाळीस ते पन्नास हजार झाडांची दहा वर्षांत लागवड
- या खर्चासाठी सरपंचांकडून आपल्या मानधनाचा वापर. उपसरपंच अर्जुन कुलकर्णी यांचीही कामांना साथ
माजी विद्यार्थ्यांचे कार्य
विविध कारणांनी बाहेरगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा 'व्हॉटसॲप ग्रुप' बनवला. त्यानुसार चार लाख रुपये जमा झाले. त्यातून शाळेत रंगरंगोटी, मुलांना बाके, बॅगांचे वाटप व अन्य कामे केली. राज्यभर ओळख असलेले नाना महाराज वनकुटे महाराज यांचे समाधीस्थळ गावात आहे. त्यांच्या समाधी मंदिराची उभारणीही लोकसहभागातून ७० लाख रुपये उभारून झाली.
राज्यातील पहिली बाल ग्रामसभा
गावाला जोडून चार वाड्या-वस्त्या आहेत. सात जिल्हा परिषदेच्या सात शाळा असून त्यात चारशेहून अधिक मुले शिकतात. या मुलांच्या समस्या अडचणी समजून घेण्यासाठी सरपंच ॲड. राहुल झावरे यांच्या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी शाळकरी मुलांची ग्रामसभा घेतली. खेळाचे साहित्य, लेझीमच्या वस्तू, सायकली, संगणक, संरक्षण भिंत, पेव्हिंग ब्लॉक्स, डिजिटल शाळा या बाबींची गरज त्यातून लक्षात आली. गावाने राज्यात पहिल्यांदाच बाल ग्रामसभा ही संकल्पना राबवली. लोकसहभाग, 'सीएसआर' निधी, ग्रामपंचायतीचा १४ वित्त आयोग व अन्य निधीतून शाळेची कामे करण्याचे नियोजन आहे.
अन् डीजे बंदी झाली
गावात आणि वाड्यावस्त्यांवर लग्नासह अन्य कार्यक्रमांत डीजे वाजवण्याची प्रथाच होती.
त्याचा त्रास करण्यासाठी तीन वर्षांपासून 'डीजे बंदी करण्याचा ग्रामसभेत ठराव झाला.
काहींनी विरोध केला. सुरुवातीच्या काळात त्याची अंमलबजावणी करताना अडचणी आल्या. परंतु आता गावातील कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवला जात नाही. गावांत गणेश उत्सवाच्या काळात १२ मंडळे असत. मात्र खर्चाला फाटा देत दोन वर्षापासून एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे.
गावातील महत्त्वाचे उपक्रम
- ओढ्यावर जलयुक्त शिवार अभियानातून ७० लाख रुपये खर्च करून दोन बंधाऱ्यांची उभारणी
- जुन्या काळातील गाव तलावांची दुरुस्ती केली. त्याचा ३०० हेक्टर क्षेत्राला फायदा
- पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत काहीसा बदल. फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल
- सिंचन कामांसाठी बाळासाहेब खामकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त व्यवस्थापन समिती कार्यरत
- स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी बॅंकेच्या मदतीने पाणी शुद्धीकरण प्रकल्प. 'एटीएम'द्वारे पाणी देण्याची सोय होणार.
- वनकुटे हे पारनेर तालुक्यातील टोकाचे गाव. येथे पारनेर व संगमनेर येथून मुक्कामी एसटी बसेस येतात. ही बाब लक्षात घेऊन चालक-वाहकांसाठी गावात खोली बांधून मुक्कामाची सोय
गावाची वैशिष्ट्ये
- सहाशे मीटर अंतरावर बंदिस्त गटारी, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण. त्यामुळे आरोग्य अबाधित राहण्यास मदत
- सुमारे अकराशे आदिवासींना ग्रामपंचायतीमार्फत जातीचे दाखले
- गावांत रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. लोकांच्या समाझोत्यानेच सर्व अतिक्रमणे काढली.
- शंभर टक्के हागणदारीमुक्त. पाहुण्यासह गावात येणाऱ्यासाठी एक सार्वजनिक शौचालय.
- लोकसहभाग आणि सरकारी निधीतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण.
- गावांतील प्रमुख चौकात 'सीसीटीव्ही'चा वॉच.
- तांडा वस्ती सुधार योजनेतून दलित वस्तीत रस्त्याचे सुशोभीकरण.
- गावांतील तरुणांसाठी व्यायामशाळेची उभारणी.
- गावातील वाद सामोपचाराने मिटवणाऱ्यावर भर. दोन वर्षात एकही गुन्हा दाखल नाही.
- गावांत १८ महिला बचत गट असून त्या माध्यमातूनही महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
५७० कुटुंबांनी बांधली शौचालये
आदिवासी आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधणे शक्य नव्हते. मात्र गावकरी आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून प्रत्येकी बारा हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले. त्यातून ५७० कुटुंबांकडे आज शौचालये बांधण्यात आली आहेत. पाचही वाड्या-वस्त्या शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
एका रस्त्याने जोडले दोन तालुके
गावाच्या हद्दीत तासगावाच्या पलीकडे राहुरी तालुक्यातील म्हैसगावसह पंचवीस गावे येतात. मुळा नदी येथून वाहते. धरणाचा फुगवटा असल्याने पारनेर आणि राहुरी तालुक्यातील गावांच्या रस्त्याच्या प्रश्न होता. तास गावात चौथीपर्यतच शाळा. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी नदीपलीकडील म्हैसगाव येथे मुले जीव धोक्यात घालून बोटीने शाळेत जात. पारनेरमधील लोकांनाही राहुरीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पन्नास किलोमीटर दुरवरुन जावे लागे. वनकुटे ग्रामस्थांच्या पुढाकाराने तास-वनकुटे हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा कोटी रुपये खर्चून रस्ता झाला. तास- म्हैसगावला जोडणारा मुळा नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे पारनेर-राहुरी तालुके एकमेकांना जोडले गेले. सर्वांचे प्रश्न सुटले.
प्रतिक्रिया
आमच्या गावाची 'स्मार्ट ग्राम' म्हणून ओळख होऊ लागली आहे. आमदार नीलेश लंके यांचे त्यासाठी चांगले सहकार्य आहे.''
ॲड. राहुल झावरे, सरपंच, वनकुटे
९०११४५११६३
गुरुवार, ३० जानेवारी, २०२०
रखडलेल्या प्रकल्पांबाबत विभागवार बैठक ; ना.शंभूराज देसाई
नवीन जिल्ह्याचा विषयच नाही...
राज्यात नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र तसा कोणताही विचार राज्य शासनापुढे नाही. त्यामुळे राज्यात नव्याने जिल्हा निर्मिती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर तसा विषय असेल, तर त्याबाबत निश्चितपणे योग्य वेळी माहिती दिली जाईल, अशी माहिती ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.
आठवलेंचा मनसेला इशारा : मशिदींना हात लावल्यास आम्ही मुस्लिमांच्या पाठीशी;
चांगल्या कामांना पाठिंबा देण्याची भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयांना त्यांनी पाठिंबा द्यावा. त्यांनी सीएएला समर्थन द्यावे, असं आठवले म्हणाले आहेत.
नवी मुंबई ; शिवसेना आणि राष्ट्रवादीनं रचला 'इनकमिंग' चा प्लान, भाजपला पडणार मोठं 'खिंडार'
खरंतर नवी मुंबईमध्ये पालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडून सत्ता काढून घेणं तसं सोप नसलं तरी अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये नाराज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. भाजपचे १५ नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात भाजपच्या नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; शनिवारी आरक्षण सोडत
अडीच महिन्यांचा कालावधी
एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत डिसेंबरमध्येच निघणे आवश्यक होते. मात्र पॅनल पद्धत रद्द झाल्यामुळे ही सोडत सुमारे दोन महिने लांबणीवर पडली. सोडतीच्या प्रक्रियेनंतर सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने त्यांची पुरती दमछाक होणार आहे.
पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश
धक्कादायक मुंबई महानगर पालिका : मराठीत शिकलेत म्हणून नाकारली नोकरी..
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांना मुलांना इंग्रजी शिकवता आलं पाहिजे, समजावता आलं पाहिजे. केवळ शालेय शिक्षण मराठी माध्यमातून असल्याने पात्र उमेदवारांना डावलणे योग्य नाही. या प्रकरणात लक्ष घालून, पुढील कारवाई करू असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
आता याप्रकरणी मराठीचा पुळका असणारे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रकल्पबाधितांसाठी १३ हजार सदनिका
आजघडीला पालिकेला प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ३२ हजार सदनिकांची आवश्यकता आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिकांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांमध्ये १३ हजार सदनिका बांधण्यासाठी पालिकेने योजना आखली आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत दिली.
पालिकेच्या प्रत्येक परिमंडळातील खासगी अथवा पालिकेच्या भूखंडावर एक हजार सदनिकांचा समावेश असलेल्या इमारती बांधण्यात येणार आहेत. देवनार येथे खासगी भूखंडावर सहा हजार, विक्रोळी येथील भूखंडावर तीन हजार घरांच्या उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी घर बांधणी करणाऱ्या विकासकांना टीडीआर देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी ३०० चौरस फुटांची सदनिका उपलब्ध करण्यात येणार आहे. माहुल परिसरात प्रकल्पग्रस्तांसाठी २० हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्यापैकी १५ हजार सदनिका रिकाम्या आहेत.
भोर बँक अधिकाऱ्याचा प्रताप : लाटले 'मुद्रा लोन'
विजय साबळे
भोर - प्रतिनिधी 'मुद्रा लोन' ग्राहकांची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंक ऑफ इंडियाच्या भोर शाखेचे माजी व्यवस्थापक यशवंत रंगनाथ बडवे यांना पोलिसांनी अटक केली.
बडवे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये भोरमधील देवेश राजेंद्र वाडकर आणि राहुल रामचंद्र दरेकर या दोघांचे मुद्रा लोन मंजूर करून ती रक्कम परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर केली. याबाबत देवेश वाडकर यांनी फिर्याद दिली. त्यांना बडवे याने, 'तुम्हाला मुद्रा लोन करून देतो, तुम्ही कागदपत्रे घेऊन या,' असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ८ जून २०१६ रोजी स्टॅम्प पेपर आणि कागदपत्रे बॅंकेत जमा केली. तसेच, बडवे याने व्हेरीफिकेशनसाठी कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेऊन ठेवल्या.
दरम्यान, बडवे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आलेल्या नवीन व्यवस्थापकांनी वाडकर यांना फोन करून नऊ लाख रुपयांच्या मुद्रा लोनच्या परतफेडीची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, राहुल दरेकर या तरुणाचीही फसवणूक झाल्याचे वाडकर यास समजले. दोघांनी बडवे यांच्याकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी दोघांच्या खात्यातील मुद्रा लोनचे जमा झालेले १८ लाख रुपये 'साईराज इंजिनिअरिंग' या खात्यावर परस्पर ट्रान्स्फर केल्याचे समजले. त्यावेळी बडवे याने एक लाख रुपये आणि साडेनऊ लाख रुपय रकमचे दोन वेगवेगळे चेक दोघांनाही दिले. परंतु, त्यापैकी केवळ एक लाखाचा चेक जमा झाला. त्यामुळे दरेकर याने फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बडवे यांच्या विरोधात शासकीय निधीचा अपहार करणे आणि ग्राहकांची फसवणूक करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. २७) सायंकाळी त्यास अटक केली. न्यायालयाने मंगळवारी त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?: मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
नवी दिल्ली : शेतकरयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदी सरकारचे आश्वासन म्हणजे मोठा जुमला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. शेती प्रक्रियामालावरील वस्तू व सेवा कर पाच टक्क्यांपेही कमी केला पाहिजेत तसेच, पेट्रोलडिझेल हे वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणून शेतकरयांना दिलासा द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
शेतकरयांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकास दरवर्षी किमान १२ टक्क्यांनी झाला पाहिजे पण, गेल्या पाच वर्षांत कृषी क्षेत्राचा विकास जेमतेम २.९ टक्क्यांनी झाला आहे.मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल? या बाबत मोदी सरकार गंभीर असेल तर उत्पन्न दुप्पट करण्याचा आराखडा यंदाच्या अर्थसंकल्पात मांडला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.
आर्थिक विकासाला चालना द्यायची असेल तर ग्रामीण भागांतील मागणी वाढवली पाहिजे. लोकांच्या हातात पसा असेल तरच त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढेल. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वंकष किमान उत्पन्न योजना सुरू केली पाहिजे. तातडीने कर्जमाफीही लागू केली पाहिजे, अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.
पेट्रोलियम पदार्थावरील करांद्वारे केंद्र सरकारने १३.५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरयांना बसला असून पेट्रोलडिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणले पाहिजेत. इंधानेच दर कमी झाले तर शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल.
मोदी सरकारच्या पीक विमा योजनेवरही चव्हाण यांनी टीका केली असून ही योजना बोगस असून शेतकरयांना पुरेसा लाभ मिळालेला नाही.
बुधवार, २९ जानेवारी, २०२०
पारनेर: शेतकऱ्याने बनवले बिबट्या सुरक्षा कवच
यावेळी त्यांच्यासमवेत आनंदा भाकरे, नीलेश भाकरे, संतोष कानडे, किरण भाकरे होते. आनंदा भाकरे यांनी आपल्यावर बिबट्याने हल्ला केला तर, अशी शंका उपस्थित केली. त्यावेळी संतोष भाकरे यांनी झाडाला पाणी देत असताना झाडाची जाळी काढत आपल्या अंगात घातली. जाळी घातल्यानंतर लक्षात आले की बिबट्या आपल्याला काहीच करू शकणार नाही. जाळीमुळे त्याला हल्ला करता येणार नाही. आपण सुरक्षित असल्याची भावना मनात निर्माण झाली व झाडाला पाणी घातले. त्यानंतर उसाला पाणी देण्याचे काम सुरू झाले.
या शेतकऱ्यांनी या जाळीचा व्हिडिओ तयार करून त्याचा प्रसार केला. त्यामुळे परिसरात रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी या जाळीचा वापर करायला सुरुवात केली. या जाळीमुळे शेतकऱ्यांना आपल्या जीवाचे संरक्षण करता येऊ लागले. या शेतकऱ्याला सुचलेल्या ऐनवेळी अफाट कल्पनेमुळे वाघ बिबट्या पासून संरक्षण करणाऱ्या जाळीचा शोध लागला. या जाळीत सुधारणा केल्यास वापर करणे अजून सुखकर होईल. या जाळीची वन अधिकाऱ्यांनी देखील स्तुती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जाळी घालून बिबट्या पकडण्यासाठी आम्हाला याची मदत होईल. अशाप्रकारची कल्पना आम्हाला देखील सूचली नाही.
सोमवार, २७ जानेवारी, २०२०
पुणे भोर मित्राच्या तेरावा विधीला रक्तदानाचा संकल्प
मौजे गलमेवाडी ग्राम विकास मंडळातर्फे जेष्ठ महिलांना मोफत गणपतीपुळे दर्शन
पत्रकारांवरील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करणार - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
मुंबईकरांनो लक्षात ठेवा, घरात भाडेकरू असेल तर माहिती पोलिसांना द्या
मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत. दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 10 (2) कलम जारी केले आहे.
त्यानुसार आपल्याकडे भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये.तसेच भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे
विदेशी नागरिकास भाडेकरु म्हणून ठेवायचे असल्यास संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्र., पासपोर्ट दिल्याचे ठिकाण व तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिसा क्र., वर्गवारी, दिल्याचे ठिकाण व तारीख, व्हिसा वैधतेची मुदत आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार कारवाईस पात्र राहील, असेही बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
धक्कादायक : अहमदनगर जिल्हा बँक भरती : उत्तरपत्रिकांच्या संशयास्पद कार्बन कॉपी तपासल्याच नाहीत
नगर जिल्हा बँकेच्या ४६५ जागांच्या भरतीत अनियमितता होत असल्याचा संशय 'लोकमत'ने व्यक्त केल्यानंतर सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करत भरतीची चौकशी केली.
उत्तरपत्रिका परीक्षा हॉलमधून सिलबंद केल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेचे बँकेने अथवा भरतीचे काम करणा-या 'नाबयर' संस्थेने चित्रीकरण केलेले नाही. त्यामुळे अनियमितता शोधण्यासाठी समितीने मूळ उत्तरपत्रिका व कार्बन कॉपी तपासून निष्कर्ष काढले होते.
भरतीचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने संशयित ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची फेरचौकशी करण्याचा आदेश दिला.
या फेरचौकशीत उत्तरपत्रिकांच्या आक्षेपार्ह कार्बन कॉपीही तपासल्या जाणे आवश्यक होते. मात्र, चौकशीसाठी नियुक्त समितीने फॉरेन्सिक तज्ज्ञ जयंत आहेर यांच्यामार्फत केवळ मूळ उत्तरपत्रिका तपासल्या. आहेर यांनी मूळ उत्तरपत्रिकांत उमेदवारांनी जे उत्तरांचे गोल केले आहेत त्यांची रंगछटा ही काळी असल्याचा दोन ओळीचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा आधार घेत हौसारे यांची समिती व विभागीय सहनिबंधक यांनी सर्व भरतीला क्लिन चिट दिली.
परीक्षा घेणा-या संस्थेने उत्तरपत्रिका विलंबाने का स्कॅन केल्या? उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व व्हिडीओ चित्रीकरण का केले नाही? नायबर संस्थेने बँकेला कल्पना न देताच भरतीत इतर संस्थांची मदत कशी घेतली? हे मुद्दे फेरचौकशी समितीने पूर्णत: दुर्लक्षित केलेले दिसतात. फॉरेन्सिक तज्ज्ञाची नियुक्ती करतानाही शासकीय संस्थेकडे हे काम देण्यात आले नाही.
फेरचौकशी समिती म्हणते कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत
फेरचौकशी समितीकडे उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आल्या नव्हत्या. मूळ उत्तरपत्रिका तपासल्याने कार्बन कॉपीची तपासणी करणे आवश्यक वाटले नाही, असे फेरचौकशी समितीचे प्रमुख दिगंबर हौसारे यांनी माहिती दिली. उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांत फेरफार झाल्याने कार्बन कॉपीतही तसे फेरफार केले गेले. पहिल्या समितीने त्याआधारेच अनियमितता सिद्ध केली आहे. याकडे लक्ष वेधले असता उमेदवारांच्या कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत, असे हौसारे म्हणाले. पहिल्या समितीला या कार्बन कॉपी उपलब्ध झाल्या. मग, फेरचौकशी समितीला का मिळाल्या नाहीत? असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.
आपणाकडे तपासणीसाठी केवळ मूळ उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यात जे गोल काळे करण्यात आले त्याची छटा आपण तपासली. उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आली नव्हती. तपासलेल्या उत्तरपत्रिकांत एक उदाहरण असे आढळले की परीक्षा एका व्यक्तीने दिली व त्याच्या जागेवर मुलाखत दुस-या व्यक्तीने दिली, असे सेवानिवृत्ती दस्तावेजांचे राज्य परीक्षक जयंत आहेर यांनी सांगितले.
"त्या' भयान राती.बिबट्या साठी. घेऊन मशाल हाती...
कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील विरोली रस्ता परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने या भागातील नागरिक दहशतीखाली आहेत. याच रस्त्यावरील पाटील मळा येथील शेतात बसविलेल्या मेंढ्यांवर ताव मारण्याच्या तयारीत आलेल्या दोन बिबट्यांना मेंढपाळाच्या समयसूचकतेमुळे रिकाम्या पोटी पळून जावे लागले.विरोली रस्त्यावरील पाटील मळा परिसरातील बाळासाहेब पोपट ठुबे यांच्या कांदापिकाची काढणी केलेल्या शेतात रेवणनाथ रावसाहेब डोईफोडे पत्नीसह शेळ्या व मेंढ्या घेऊन रात्री मुक्कामी होते. नऊच्या सुमारास दोन बिबटे मेंढ्यांच्या दिशेने येताना पाहून, रेवण डोईफोडे यांनी मशाल पेटवून बिबट्यास घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरण्याऐवजी एक बिबट्या जोरजोरात गुरगुरत पुढे येण्याचा प्रयत्न करीत होता. हे पाहून डोईफोडे यांच्या पत्नीही मदतीसाठी जोरात आवाज देऊ लागल्या.
दुचाकी वाहनांचा आवाज ऐकून गेले
परिसरातील प्रगतशील शेतकरी अण्णा सोनावळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठुबे तरुणांना एकत्र घेऊन घटनास्थळी गेले. चारचाकी व काही दुचाकी वाहनांचा प्रकाश व आवाज ऐकून बिबटे अगदी शांतपणे शेजारील ज्वारीच्या पिकात निघून गेले आणि मोठा अनर्थ टळला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र सुरवातीला तो होऊ शकला नाही. वनाधिकारी निर्मला शिंदे यांच्याशी मात्र संपर्क झाला. बिबट्या पकडण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा, त्यानंतर तातडीने पिंजऱ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परिसरात दोन बिबटे असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
३ हजार ऊस दरापासून शेतकरी दूरच
ज्या कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत, त्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. अनेक कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकर्यांना पैसे मिळाले नाहीत. पहिल्या टप्प्यात दर जाहीर करून पुढील टप्प्यात 100 ते 200 रुपये अधिक देणार असल्याचे कारखान्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कारखान्यांकडून एफआरपी कायद्याला हरताळ फासला असून यावर साखर आयुक्त कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे गाळप हंगामास उशिरा सुरुवात झाली. याचा फटका कारखान्यासह शेतकर्यांनाही बसणार आहे. उशिरा तोड सुरू झाल्याने उसाचे वजन कमी होत आहे. त्यामुळे एका खेपेला किमान 3 टन वजनाची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. तसेच ज्या शेतकर्यांनी उस घातला आहे, त्यांना सरासरी 2500 ने पहिला हप्ता खात्यावर जमा केला आहे. एफआरपीचे नेहमीप्रमाणे यंदाही तुकडे पडणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्यात फक्त कराड व पाटण तालुक्याला महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापेक्षा जास्त नुकसान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकर्यांचे झाले आहे. असे असताना या जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला चांगला दर दिला आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या बैठकीत प्रति टन 3 हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला तेथील कारखानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदा साखरेलाही चांगला दर मिळाला असल्यामुळे थोडा जास्त दर देण्यास कारखान्यांना काहीच फरक पडत नाही.
इतर कारखान्यांनीही 3 हजार रुपये द्यावा
सह्याद्री साखर कारखान्याने 2 हजार 855 दर जाहीर केला आहे. दुसर्या टप्प्यातही काही रक्कम शेतकर्यांना देण्यात येणार असल्याने सह्याद्रीची एफआरपी (उस तोडणी वगळून) ही 3 हजारांवर जाणार असल्याची शक्यता आहे. इतर कारखान्यांनीही आपले दर जाहीर केले आहे. मात्र, ते या दरापेक्षा सुमारे 200 रूपयांनी कमी आहे. आता उसतोड अंतिम टप्प्यात असून इतर कारखान्यांनी सह्याद्रीचा आदर्श घेवून शेतकर्यांना प्रतिटन 3 हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी होत आहे.
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
गगनगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
सातारा पोलिसांचा पॅटर्न राज्यभर राबवणार : ना. शंभुराज देसाई
सागरिका कॅन्टीनचे उद्धघाटन ; पोलिसांसह आजी माजी सैनिकांनाही सवलत ; ना. देसाईंचा असाही मोठेपणा
सातारा, दि.18 (प्रतिनिधी)
सातारा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सागरिका कॅन्टीनच्या माध्यमातून बाजारभावापेक्षा निम्म्या दराने पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी फायदा घ्यावा. सातारा पोलीस दलाने राबवलेला हा उपक्रम राज्यभर राबवला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिली. ते पोलीस करमणूक केंद्रावरील सागरिका या कॅन्टीनच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना किराणा माल बाजारभावापेक्षा कमी दराने मिळावा, यासाठी तत्कालीन अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी सागरिकाची संकल्पना पुढे आणली होती. त्यापुढे जात सातपुते यांनी कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपल्बध करून दिल्या आहेत. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम तणावात रहावे लागते. अशावेळी आर्थिक घडी बसवतानाही त्यांची मोठी कसरत होते. त्यामुळे 'सागरिका'चा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे, शिवाय राज्याला आदर्श देणारा आहे. त्यामुळे राज्यभर प्रत्येक जिल्हा पोलीस दलाला हा उपक्रम राबवण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, 'सागरिका'मध्ये किराणा साहित्यापासून ते टीव्ही, फ्रीजपर्यंत सगळ्या वस्तू कमी दरात विक्री केल्या जात आहेत. या उपक्रमाला कर्मचाऱ्यांमधूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने दर दिवशी तीस हजारांची विक्री होणाऱ्या या कॅन्टीनमध्ये सध्या दरदिवशी तीन लाखांची विक्री होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी केले तर आभार उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी मानले.
पोलिसांसह आजी माजी सैनिकांनाही सवलत
सागरिका कॅन्टीन हे पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी असले तरी त्याठिकाणी आर्मी, बीसएफ, एसआरपी याठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही खुले करण्यात आल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
ना. देसाईंचा असाही मोठेपणा
काही दिवसांपूर्वी ना. देसाई यांच्या ताफ्यातील एका गाडीचा सायरन न वाजल्याने तसेच काही तांत्रिक चुकांमुळे गाडीच्या चालकाला निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर एसपींनी त्या कर्मचाऱ्याचे निलंबन केले होते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी परिवहन विभागाला मनुष्यबळ नसल्याने वाहने नादुरूस्त राहत आहेत, परिणामी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत असल्याचे ना. देसाई यांच्या लक्षात आणून दिले असता, काही तांत्रिक गोष्टींमुळे निलंबन केल्याचे सांगत, उद्घाटनाच्या कार्यक्रमात माध्यमांसमोरच ना. देसाई यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.
सातारा : ग्रामसेवकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई?
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून 5 टक्के निधीतून दिव्यांग कल्याणासाठीचा संपूर्ण खर्च केला नसल्याची बाब पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांच्या अहवालानुसार निदर्शनास आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता व हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार उभी राहिली आहे.
सातारा जिल्ह्यात 1 हजार 496 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना सन 2018 व 19 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून 5 टक्के निधीतून दिव्यांग कल्याणासाठीचा संपूर्ण खर्च हा ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयामध्ये नमुद केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार 31 मार्च 2019 अखेर केला नसल्याचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांच्याकडील अहवालानुसार निदर्शनास आले आहे.
याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना गटविकास अधिकार्यामार्फत कळविण्यात आले आहे. तरीही संबंधित ग्रामसेवकांनी अखर्चीत रक्कमेचा भरणा जिल्हास्तरावरील खात्यावर करून चलनाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे सादर केला नाही. राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी सातारा जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत सन 2018 व 19 या वर्षाचा 5 टक्के दिव्यांग कल्याण खर्च निधी अखर्चित ठेवल्याप्रकरणी संबधितांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांनी कामकाजामध्ये हलगर्जीपणा व अनियमितता केल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियमान्वये तुमच्या विरूध्द शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? याबाबत तुमचा खुलासा 8 दिवसांत गटविकास अधिकार्यामार्फत सादर करावा. खुलासा मुदतीत अगर समाधानकारक नसल्यास प्रस्तावित कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या सहीनिशी बजावली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
शेखर सिंह सातार्याचे नवे जिल्हाधिकारी
सातारा : प्रतिनिधी
सातार्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवार योजनेला आणखी गती दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी एन्. रामास्वामी यांच्यानंतर अश्विन मुद्गल यांनी विकासातील सातत्य श्वेता सिंघल यांनीही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जलयुक्त शिवार अशा अनेक योजना आणि सरकारी उपक्रम त्यांनी तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला
गत महिन्यात मसूरी येथे आयएएस अधिकार्यांच्या झालेल्या प्रशिक्षणात श्वेता सिंघल यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.त्यांची बदली पुणे येथे अतिरिक्त आयुक्तपदी झाली आहे. राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश दिले आहेत. सिंघल यांच्या जागी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. सिंह हे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2016 साली सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा बहुमान त्यांनी मिळवून दिला. शेखर सिंह यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही कर्तव्यदक्ष व कणखर अधिकारी म्हणून कामाचा ठसा उमटविला. शेखर सिंह हे सातार्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारतील त्यावेळी पूर्वीच्या अधिकार्यांनी जिल्ह्यात विकासकामांतून निर्माण केलेली बॅटन पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
बछड्याच्या मृत्यूने मादीचा नागरिकांवर हल्ला धामणी ता.पाटण येथील घटना; भीतिदायक वातावरण
धामणी ता.पाटण येथील घटना; भीतिदायक वातावरण
ढेबेवाडी - तीन दिवसांपूर्वी धामणी ता. पाटण येथे भावके वस्तीजवळ बिबट्याचा सव्वा वर्षाचा बछड्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मरण पावला. यावेळी त्याच्यासोबत असणारी त्याची आई मादी बिबट्या मात्र आपल्या बछड्याच्या वियोगाने व्याकुळ झाली आहे.
रात्रीच्या वेळेस अनेकांना तिचा आक्रोश कानावर पडला आहे. तसेच ही मादी नागरिकांवर हल्ला करू लागली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केतन झेंडे याच्यावर घटनेदिवशीच हल्ला झाला होता. त्यात तो जखमी झाला. तर दिलीप सावंत भर वस्तीत बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगितले.
धामणी परिसरात ही घटना घडली होतीवनरक्षकांनी सदर ठिकाणी भेट देऊन बिबट्याच्या बछड्यास ताब्यात घेतले होते. मात्र या घटनेनंतर मादी बिबट्या धामणी परिसरात सतत फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसत आहे. अनेकवेळा घटनास्थळी येऊन बछड्याचा शोध घेताना दिसते. यावेळी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवरही हल्ले ती करत आहे.
त्यामुळे रात्रीचा प्रवास भितीदायक बनला आहे. या मादीने भरवस्तीत येऊन केतन झेंडे यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले आहेत. या घटनेच्या दुसऱ्यादिवशी दिलीप सावंत हॉटेलवाले यांनाही सदर बिबट्या गावात फिरताना दिसला आहे. वनविभागाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. वन विभागाकडून रात्रगस्तही घालण्यात येत आहे. मात्र, सापळा लावण्यासाठी वरिष्ठांकडून अजून मंजुरी मिळाली नसल्याचे अमृत पन्हाळे यांनी सांगितले.
यापूर्वी वाल्मिकी पठारावरील अनेक गावे वाड्यावस्त्या तसेच शिद्रुकवाडी, खळे, काढणे, ढेबेवाडी वांग नदी संगम पूल, मदनेवस्ती (जानुगडेवाडी), मानेगाव आदी ठिकाणी बिबट्याने हल्ला करून शेळ्या, कुत्री फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. नोकरदार वर्गाला सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते. तसेच रात्री येण्यासही उशीर होतो. बिबट्याच्या भितीमुळे अनेकांनी कामावर जाणे बंद केले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ सापळा लावावा, अशी मागणी वंदना आचरे यांनी केली आहे.
काळगाव-धामणी परिसरात या बिबट्याच्या दहशतीसह गवा रेडे, डुकरे, वानरे, मोर यांच्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीने जनता त्रस्त आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून उरलेल्या पिकांचेही वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.
ज्ञानदेव आचरे, प्रगतिशील शेतकरी
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
स्वच्छ मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराजबाबांचे नाव अग्रक्रमाने पुढे येईल :नामदार शंभूराज देसाई
कुंभारगाव (ता.पाटण,जि. सातारा) :
राज्याचा राजकीय इतिहास ज्या ज्यावेळी लिहिला जाईल. त्या त्यावेळी स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराजबाबांचेही नाव अग्रक्रमाने पुढे येईल अशा शब्दात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले.
कुंभारगाव (ता. पाटण)येथे आयोजित कार्यक्रमात देसाई बोलत होते. तुमच्यामुळेच मी आमदार आणि मंत्री बनलोय याची जाणीव मला आहे. राज्यात कुठेही असलो तरी घारीचे चित्त तिच्या पिलांपाशीच असते एवढेच तुम्ही ध्यानात ठेवा', सांगत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गृहराज्यमंत्रीपदी निवडीबद्दल कुंभारगाव येथे शंभूराज देसाई यांचा सत्कार झाला.
देसाई म्हणाले,' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे. आपापल्या खात्याचे कामकाज समजावून घेवून लोकाभिमुख कारभार करा. वचननाम्याची तंतोतंत पूर्तता करण्याची जबाबदारी मंत्री मंडळाची आहे.
ही त्यांची अपेक्षा शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून मी पूर्ण करेन आणि त्यांनी टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पेलेन. कामाचा कितीही ताण असला तरी मतदार संघातील संपर्क मी कधीही कमी होवू देणार नाही.मला तुम्ही जनतेनेच आमदार केले आहे, आमदार झालो नसतो तर मंत्रीही दिसलो नसतो. मतदार संघासाठी जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे तेवढा मी देईन.
लोकने ज्या े बाळासाहेब देसाई यांनी ज्या खात्याचा कारभार समर्थपणे पेलला त्याच खात्याची जबाबदारी योगायोगाने माझ्याकडे आली आहे,मी त्यांच्यासारखे काम करेन असे म्हणणार नाही परंतु त्यांच्या रक्ताचा आणि राजकीय विचारांचा वारसदार या नात्याने लोकनेत्यांच्या विचारांशी साजेसे काम नक्कीच करेन असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार होता. मात्र श्री. चव्हाण यांना पक्षाच्या महत्वाच्या कामानिमित्ताने दिल्लीला जावे लागले. तसेच बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमुळे कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
मुलानेच निर्घृणपणे केले आईचे तुकडे, घाटकोपर हत्याकांडाची उकल
माहिम हत्याप्रकरणानंतर घाटकोपर परिसरात ३० ते ३५ वयोगटातील महिलेचे २९ डिसेंबर रोजी धड सापडल्याने खळबळ उडाली. त्यापाठोपाठ पाय आणि कुजलेल्या अवस्थेत महिलेचे शीर सापडले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला.
याच दरम्यान बुधवारी एका तरुणाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात, मुलानेच आईसोबत झालेल्या भांडणातून आधी तिचा गळा दाबून हत्या केली.
बुधवार, ८ जानेवारी, २०२०
पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पाहा तुमच्या जिल्हाचे पालकमंत्री कोण?
मुंबई: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.पाहूयात ही पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी...
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
मुंबई शहर: अस्लम शेख
मुंबई उपनगर: आदित्य ठाकरे
ठाणे: एकनाथ शिंदे
रायगड: आदिती तटकरे
रत्नागिरी: अनिल परब
सिंधुदुर्ग: उदय सामंत
पालघर: दादाजी भुसे
नाशिक: छगन भुजबळ
धुळे: अब्दुल सत्तार
नंदुरबार: के. सी. पाडवी
जळगाव: गुलाबराव पाटील,
अहमदनगर: हसन मुश्रीफ
सातारा: शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील
सांगली: जयंत पाटील
सोलापूर: दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर: बाळासाहेब थोरात
पुणे: अजित पवार
औरंगाबाद: सुभाष देसाई
जालना: राजेश टोपे
परभणी: नवाब मलिक
हिंगोली: वर्षा गायकवाड
बीड: धनंजय मुंडे
नांदेड: अशोक चव्हाण
उस्मानाबाद: शंकरराव गडाख
लातूर: अमित देशमुख
अमरावती: यशोमती ठाकूर
अकोला: बच्चू कडू
वाशिम: शंभुराज देसाई
बुलढाणा: राजेंद्र शिंगणे
यवतमाळ: संजय राठोड
नागपूर: नितीन राऊत
वर्धा: सुनिल केदार
भंडारा: सतेज पाटील
गोंदिया: अनिल देशमुख
चंद्रपूर: विजय वडेट्टीवार
गडचिरोली: एकनाथ शिंदे
कुंभारगाव ता.पाटण येथे आ.बाळासाहेब पाटील आणि आ.शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार :
मंगळवार, ७ जानेवारी, २०२०
पंढरपुरात कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या
पंढरपूर येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या करण्यात आली आहे. बाजीराव जगताप यांनी ही हत्या केली असून मठाधिपतीच्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे. पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ आहेत. यातील कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. चाकूने वार करत ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जयवंत पिसाळ कराडकर महाराज मठाचे मठाधिपती होते. मात्र या मठाच्या मठाधिपतीमध्ये वाद होता. अशातच आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या प्रकरणी बाजीराव जगताप यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी शहारातील मठाधिपती यांची हत्या आणि मठातील वाद चव्हाट्यावर आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे
कोरठण यात्रेचा प्रशासनाने घेतला आढावा
या बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गटविकास अधिकारी माने, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, उपअभियंता प्रशांत आडवाई, आगारप्रमुख पराग भोपळे, सरपंच अशोक घुले, यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष किसन धुमाळ, विश्वस्त मनीषा जगदाळे, अश्विनी थोरात, महेंद्र नरड, बन्सी ढोमे, किसन मुंडे, अमर गुंजा
ळ, हनुमंत सुपेकर, चंद्रभान ठुबे, दिलीप घोडके, देवीदास क्षीरसागर, रामदास मुळे, बबन झावरे, जालिंदर खोसे, लक्ष्मण सुंबरे, उत्तम सुंबरे, सुरेश सुपेकर, सुरेश गायकर,अच्युतराव जगदाळे, राजू मटाले, गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते.
सोमवार, ६ जानेवारी, २०२०
आमदार निलेश लंके ; मंगळवारी अहमदनगरमध्ये घेणार जनता दरबार
पारनेर मतदार संघाला जोडलेल्या ४२ गावातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडावेत.त्या प्रश्नांची जागेवर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.मंगळवार दि.७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता द्वारका लॉन नगर कल्याण रोड या ठिकाणी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून जनतेने योग्य कागदपत्रे घेऊन या ठिकाणी यावे असे आवाहन आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...