गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

भोर बँक अधिकाऱ्याचा प्रताप : लाटले 'मुद्रा लोन'

विजय साबळे

भोर - प्रतिनिधी  'मुद्रा लोन' ग्राहकांची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंक ऑफ इंडियाच्या भोर शाखेचे माजी व्यवस्थापक यशवंत रंगनाथ बडवे यांना पोलिसांनी अटक केली.

बडवे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये भोरमधील देवेश राजेंद्र वाडकर आणि राहुल रामचंद्र दरेकर या दोघांचे मुद्रा लोन मंजूर करून ती रक्कम परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर केली. याबाबत देवेश वाडकर यांनी फिर्याद दिली. त्यांना बडवे याने, 'तुम्हाला मुद्रा लोन करून देतो, तुम्ही कागदपत्रे घेऊन या,' असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ८ जून २०१६ रोजी स्टॅम्प पेपर आणि कागदपत्रे बॅंकेत जमा केली. तसेच, बडवे याने व्हेरीफिकेशनसाठी कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेऊन ठेवल्या.

त्यानंतर वाडकर यांनी लोन मंजूर झाले नसल्यामुळे कागदपत्रांची मागणी केली. परंतु, बडवे यांनी कागदपत्रे दिली नाहीत.

दरम्यान, बडवे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आलेल्या नवीन व्यवस्थापकांनी वाडकर यांना फोन करून नऊ लाख रुपयांच्या मुद्रा लोनच्या परतफेडीची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, राहुल दरेकर या तरुणाचीही फसवणूक झाल्याचे वाडकर यास समजले. दोघांनी बडवे यांच्याकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी दोघांच्या खात्यातील मुद्रा लोनचे जमा झालेले १८ लाख रुपये 'साईराज इंजिनिअरिंग' या खात्यावर परस्पर ट्रान्स्फर केल्याचे समजले. त्यावेळी बडवे याने एक लाख रुपये आणि साडेनऊ लाख रुपय रकमचे दोन वेगवेगळे चेक दोघांनाही दिले. परंतु, त्यापैकी केवळ एक लाखाचा चेक जमा झाला. त्यामुळे दरेकर याने फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बडवे यांच्या विरोधात शासकीय निधीचा अपहार करणे आणि ग्राहकांची फसवणूक करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. २७) सायंकाळी त्यास अटक केली. न्यायालयाने मंगळवारी त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...