गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?: मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

नवी दिल्ली : शेतकरयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदी सरकारचे आश्वासन म्हणजे मोठा जुमला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. शेती प्रक्रियामालावरील वस्तू व सेवा कर पाच टक्क्यांपेही कमी केला पाहिजेत तसेच, पेट्रोलडिझेल हे वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणून शेतकरयांना दिलासा द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

शेतकरयांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकास दरवर्षी किमान १२ टक्क्यांनी झाला पाहिजे पण, गेल्या पाच वर्षांत कृषी क्षेत्राचा विकास जेमतेम २.९ टक्क्यांनी झाला आहे.मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल? या बाबत मोदी सरकार गंभीर असेल तर उत्पन्न दुप्पट करण्याचा आराखडा यंदाच्या अर्थसंकल्पात मांडला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

आर्थिक विकासाला चालना द्यायची असेल तर ग्रामीण भागांतील मागणी वाढवली पाहिजे. लोकांच्या हातात पसा असेल तरच त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढेल. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वंकष किमान उत्पन्न योजना सुरू केली पाहिजे. तातडीने कर्जमाफीही लागू केली पाहिजे, अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.

पेट्रोलियम पदार्थावरील करांद्वारे केंद्र सरकारने १३.५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरयांना बसला असून पेट्रोलडिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणले पाहिजेत. इंधानेच दर कमी झाले तर शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल.

मोदी सरकारच्या पीक विमा योजनेवरही चव्हाण यांनी टीका केली असून ही योजना बोगस असून शेतकरयांना पुरेसा लाभ मिळालेला नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...