बुधवार, २९ जानेवारी, २०२०

पारनेर: शेतकऱ्याने बनवले बिबट्या सुरक्षा कवच

पारनेर - शेतकऱ्याच्या अफाट कल्पनेतून स्वतःचे बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी जाळीचा वापर करण्यात येत आहे. या जाळीमुळे बिबट्या व अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून माणसाचा बचाव होऊ शकतो. ही जाळी पारनेर व शिरूर तालुक्‍यांच्या सीमाभागावर असणाऱ्या शिरूर तालुक्‍यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी तयार केली आहे.
शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजीतील माळवाडी येथील शेतकरी संतोष रामदास भाकरे आपल्या चौघा साथीदारांसह रात्री माळवाडी येथील स्मशानभूमीत लावलेल्या झाडांना पाणी देत होते. बिबट्याचे पावले याठिकाणी असल्याने त्यांच्या मनामध्ये भीती होती. पारनेर तालुक्‍यातील वडनेर बुद्रुक येथील एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता, ही घटना ताजी असल्याने त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण होते.

यावेळी त्यांच्यासमवेत आनंदा भाकरे, नीलेश भाकरे, संतोष कानडे, किरण भाकरे होते. आनंदा भाकरे यांनी आपल्यावर बिबट्याने हल्ला केला तर, अशी शंका उपस्थित केली. त्यावेळी संतोष भाकरे यांनी झाडाला पाणी देत असताना झाडाची जाळी काढत आपल्या अंगात घातली. जाळी घातल्यानंतर लक्षात आले की बिबट्या आपल्याला काहीच करू शकणार नाही. जाळीमुळे त्याला हल्ला करता येणार नाही. आपण सुरक्षित असल्याची भावना मनात निर्माण झाली व झाडाला पाणी घातले. त्यानंतर उसाला पाणी देण्याचे काम सुरू झाले.

या शेतकऱ्यांनी या जाळीचा व्हिडिओ तयार करून त्याचा प्रसार केला. त्यामुळे परिसरात रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी या जाळीचा वापर करायला सुरुवात केली. या जाळीमुळे शेतकऱ्यांना आपल्या जीवाचे संरक्षण करता येऊ लागले. या शेतकऱ्याला सुचलेल्या ऐनवेळी अफाट कल्पनेमुळे वाघ बिबट्या पासून संरक्षण करणाऱ्या जाळीचा शोध लागला. या जाळीत सुधारणा केल्यास वापर करणे अजून सुखकर होईल. या जाळीची वन अधिकाऱ्यांनी देखील स्तुती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जाळी घालून बिबट्या पकडण्यासाठी आम्हाला याची मदत होईल. अशाप्रकारची कल्पना आम्हाला देखील सूचली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...