मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

कोरठण यात्रेचा प्रशासनाने घेतला आढावा

पारनेर प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव दि.10 पासून सुरू होत आहे. यात्रेच्या नियोजनाचा आढावा कोरठण येथे प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, मानकरी यांच्या संयुक्त बैठकीत प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घेतला.
या बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गटविकास अधिकारी माने, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, उपअभियंता प्रशांत आडवाई, आगारप्रमुख पराग भोपळे, सरपंच अशोक घुले, यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष किसन धुमाळ, विश्‍वस्त मनीषा जगदाळे, अश्‍विनी थोरात, महेंद्र नरड, बन्सी ढोमे, किसन मुंडे, अमर गुंजा
ळ, हनुमंत सुपेकर, चंद्रभान ठुबे, दिलीप घोडके, देवीदास क्षीरसागर, रामदास मुळे, बबन झावरे, जालिंदर खोसे, लक्ष्मण सुंबरे, उत्तम सुंबरे, सुरेश सुपेकर, सुरेश गायकर,अच्युतराव जगदाळे, राजू मटाले, गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते.
यावेळी कोरठण यात्रेसाठी जि.प.व पं.स.मधून ग्रामपंचायतीला अनुदानाची तरतूद, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, एसटीकडून विविध ठिकाणांहून 40 बस व्यवस्था, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका आदी बाबींचे नियोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...