शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

पाटण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पाटण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत पाटण पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सचिन आनंदा भिसे (वय 32, रा. नाटोशी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. नोव्हेंबर 2019 मध्ये व 26 जानेवारी 2020 रोजी संशयित भिसेने मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे. त्याची फिर्याद मुलीने दिली आहे. त्यावरून पोस्को कायद्याने भिसेवर गुन्हा नोंद आहे. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...