शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

जी एस महानगर बँकेच्या नूतन अध्यक्षांना अण्णा हजारे यांच्या कडून शुभेच्छा !

कुमजाई पर्व वेब  प्रतिनिधी पारनेर :  पूर्वीची अहमदनगर कॉ, ऑ, बँक असणारी नंतर महानगर बँक झाली.ज्यांनी ही बँक खासकरून मुंबईत असणाऱ्या सर्वसामान्य पारनेर कर जनतेसाठी चालू केली.अनेक जणांना ह्या बँकेच्या मार्फत कर्ज देऊन व्यवसाय वृद्धी साठी मदत केली .त्या बँकेचे संस्थापक सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर त्या बँकेची धुरा समर्थ पणे वाहणारे त्यांचे चिरंजीव उदय शेळके यांची पुन्हा ह्या जी एस महानगर बँकेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे
स्व.गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर ही बँक त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या असंख्य ठेवीदार,व कर्जदार यांच्या आग्रहा खातर महानगर बँकेचं नामांतर करून जी एस महानगर बँक करण्यात आलं.आज अनेक बँका डबघाईला असताना ही बँक मात्र उदय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार कामगिरी करत असून राज्य भर शाखेचे जाळ ह्या बँकेने विणलेले आहे.
उदय शेळके यांनी आपलं गाव असणार पिंप्री जळसेन ह्या ठिकाणी पाणी फाऊंडेशन च जोरदार काम राबविण्यात महत्वाचा वाटा तर उचलला होता परन्तु हे गाव ह्या स्पर्धेत राज्यात दुसर ही आलं होत.त्यांच्या ह्या बिनविरोध अध्यक्ष पदी निवडीच अण्णांनी ही कौतुक करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.व सामाजिक कामात असच अग्रेसर रहा असा प्रेमाचा सल्ला ही दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...