ढेबेवाडी प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर डिपी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ही बरेच दिवसांची मागणी ना. शंभूराज देसाई यांच्याकडे करताच त्यांनी तत्काळ पूर्ण केल्याने लोकांनी समाधान व्यक्त करून गावच्या विकासासाठी झुकते माप देणाऱ्या ना. देसाई यांचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मंद्रूळकोळे खुर्द येथली उपसरपंच संजय लोहार, माजी सरपंच सतिश कापसे, मा.सदस्य रविंद्र उर्फ राजू रोडे, मा.चेअरमन अविनाश साळुंखे, अविनाश उर्फ पोपट काटकर या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक जणांनी ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याबाबत संजय लोहार म्हणाले आमच्या गावची विकास कामे व्हावी यासाठी विकास कामे देण्याची धमक असणारे नेतृत्व ना. देसाई साहेबांच्या पक्षात आम्ही प्रवेश केला. यानंतर गावच्या प्रमुख रस्त्याच्या कामासह, इतर अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरण काँक्रीटीकरण, सभामंडप अशी कामे झाली दीड वर्षात सुमारे दीड कोट रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. आमच्याकडे लाईट व्होल्टेज कमी असल्याने ट्रांसफार्मर बदलावा व एक लाईन वाढवावी अशी लोकांची मागणी होती ही मागणी साहेबांच्या कडे करताच त्यांनी लगेचच हे काम मार्गी लावून यासाठी तरतूद केली. यामुळे लोकांच्यात समाधानाचे वातावरण असून जनतेच्या सेवेसाठी तत्पर भूमिका असणारा नेता असे ना. देसाई साहेबांच्या बद्दल म्हटले जात आहे. ना. देसाई साहेबांच्या माध्यमातून गावचा विकासात्मक कायापालट होईल याचा आम्हाला विश्वास आहे असे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा