गुरुवार, ७ मे, २०२६

मंद्रूळकोळे खुर्द प्रीमियर लीग स्पर्धेत विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्स विजेता.

ढेबेवाडी प्रतिनिधी 
           मंद्रूळकोळे खुर्द प्रीमिअर लीग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली, यामध्ये विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्स हा संघ विजेता झाला असून प्रथम क्रमांकाचे 25000 हजार रुपयांचे बक्षिस व मैत्री चषक तर भावड्या स्पोर्ट्स या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले असून 15000 हजार रुपयांचे बक्षिस व मैत्री चषक प्राप्त केला आहे.
         मंद्रूळकोळे खुर्द येथे नुकत्याच भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये गावातील सहा संघात १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी भव्य बक्षिस ठेवण्यात आली होती प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे बक्षीस सनी साळुंखे व प्रथमेश पाटील यांचे कडून द्वितीय क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे बक्षीस माजी चेअरमन दादासाहेब साळुंखे व आदित्य साळुंखे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. ॲड. ए पी पाटील, सदाशिव कदम महाराज, अविनाश उर्फ पोपट काटकर, सुनिल काळुगडे, संतोष उर्फ राजू पाटील, राजेंद्र कापसे दादा, अमर पाटील, रित्विक सचिन कुंभार, जयराज भरुगडे, विश्वनाथ गणेश मंडळ यांच्याकडून वैयक्तिक बक्षीसाठी व इतर बाबीसाठी सहकार्य राहिले. उपसरपंच संजय लोहार व शिवमुद्राचे संस्थापक शिवाजी यादव यांच्याकडून मैत्री चषक व संघमालकाना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर बेस्ट खेळाडू व मन ऑफ द मॅच मिळविणाऱ्या खेळाडूना सन्मान ट्रॉफी देऊन शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून गौरविण्यात आले.
         या स्पर्धेत ओंकार पाटील हा अष्टपैलू खेळाडू मन ऑफ द सिरीज ठरला असून बेस्ट बॅट्समन अक्षय पाटील, बेस्ट बॉलर संकेत रोडे, बेस्ट फिल्डर अनिकेत पाटील यांनी चांगली कामगिरी करून त्यांनी बक्षिस मिळविले त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
       या स्पर्धेतील विजेताना ॲड ए पी पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पंचायत समिती सदस्य नितीन काळे, युवा नेते रणजीत पाटील, विभागाचे नेते मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, अध्यक्ष लालासाहेब पाटील प्रा. यशवंत काळे, सुभाष बापू गोडांबे, सचिन वाघमारे, अंकुश गोडांबे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.
विश्वनाथ फायटर स्पोर्ट चे संघमालक व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राजू रोडे सर म्हणाले स्पर्धा अतिशय चांगल्या झाल्या असून गावातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील प्रमुख मंडळींनी चांगले मैदान निर्माण करून दिलेले आहे. असेच जरवर्षी गावच्या यात्रेनिमित क्रिकेट स्पर्धा घेऊन आम्हा क्रिकेट प्रेमी खेळाडूंना एक चांगली संधी द्यावी. यावेळी  गावचे उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

चौकट    
     या स्पर्धेच्या निमित्ताने लोकनियुक्त सरपंच सौ. उमादेवी भोई, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कदम, बाळासाहेब रोडे, सदस्या सौ. कमल पाटील, पोलिस पाटील विजय उर्फ राजू लोहार, तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील, माजी चेअरमन अविनाश साळुंखे, माजी चेअरमन दादासाहेब साळुंखे, अविनाश कापसे दादा, शिवमुद्राचे संस्थापक शिवाजी यादव, मा. ग्रामपंचायत सदस्य राजू रोडे, मा. सदस्या संगीता लोहार, बचत गट समन्वयक सुनिता लोहार. बजरंग पाटील, बजरंग भरुगडे, धनाजी भरुगडे दादासाहेब पाटील आदी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो
   मान्यवरांच्या हस्ते विजेता संघाचे बक्षीस व चषक स्वीकारताना विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्सचे खेळाडू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...