बुधवार, १३ मे, २०२६

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*



पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक
*पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वापरासाठी मोफत वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटण ते मुंबई पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा शुक्रवार, 15 मे रोजी सकाळी 8.30 वाजता पाटणच्या झेंडा चौकातून सुरू होणार आहे.
        मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेचा उद्देश पाटण तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवणे हा आहे. “ही लढाई कोणत्याही राजकारणासाठी नाही, तर पाटणच्या जनतेच्या हक्कासाठी आहे,” असे गोरख नारकर यांनी सांगितले.
       पाटण तालुक्यात कोयना धरणाच्या माध्यमातून हजारो मेगावॅट वीज निर्मिती होत असतानाही स्थानिक जनतेला वेळेवर वीज मिळत नाही. हजारोंच्या संख्येने असलेल्या पवनचक्की मधून हजारो मेगावँटगावँट विजनिर्मिती होते. तसेच तारळे येथे अदानी प्रकल्प स्थानिकांच्या मानगुठी वररी येऊन बसवला जात आहे. यामध्ये २७०० मेगावँट विजनिर्मिती केली जाणार आहे. पाटण तालुका हे विजेचे माहेरघर झाले असून स्थानिकांना या विजेचा काय फायदा होतो. वीज बिल माफीचा प्रश्न प्रलंबित आहे. तालुक्याने महाराष्ट्राला प्रकाश दिला, पण स्वतः अंधारात राहण्याची वेळ आल्याचा आरोप मनसेने केला आहे.
     लोकहिताची मागणी असून
पदयात्रेच्या निमित्ताने मनसेने लोकहिताची मागणी करत आवाहन केले आहे. “पाटण तालुक्याच्या त्यागावर महाराष्ट्र तेजोमय होत आहे. पण आमच्या गावात शेतकऱ्यांना पाणी नाही, घरात वीज नाही आणि बिल मात्र वेळेवर हवे आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही,” असे नारकर म्हणाले.
     मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी तालुकाउपाध्यक्ष संजय सत्रे, राहुल संकपाळ, शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलावडे, मोरणा विभाग अध्यक्ष रामचंद्र माने, सुपने विभाग अध्यक्ष संभाजी चव्हाण यांनी पाटण तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि नागरिकांना या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपला पाठिंबा बहुमोल आहे, आपली साथ महत्त्वपूर्ण आहे. विचार करू नका, पक्ष-गट-राजकारण बाजूला ठेवून निखळ समाजकारणासाठी एकत्र या,” असे आवाहन पदयात्रेच्या पत्रकातून करण्यात आले आहे.
      मनसे आक्रमक झाले असून मोफत वीज मिळालीच पाहिजे या मागणीसाठी मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. “मंत्रालयात जाऊन पाटणचा आवाज पोहोचवू. वीज माफी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,” असा निर्धार गोरख नारकर यांनी व्यक्त केला.

पदयात्रेदरम्यान मार्गातील गावांमध्ये जनजागृती सभा घेण्यात येणार असून, 15 मे रोजी सुरू झालेली ही पदयात्रा मंत्रालयात निवेदन देऊनच थांबणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...