शनिवार, १६ मे, २०२६

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*



*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*  

*शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*  

कुंभारगाव , प्रतिनिधी | दि. 15 मे 2026*  
नवी मुंबई घणसोली शिवसेना शाखाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले युवा नेते *मा. श्री. चंद्रकांत रघुनाथ माने* यांचा 50वा वाढदिवस मान्याचीवाडी, कुंभारगाव येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. 

या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास *पाटण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रमेश मोरे (बापू), श्री. जितेंद्र केसेकर, चिखलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. किशोर मोरे, माथाडी नेते श्री दिनकर सणगुले,श्री.सचिन कदम श्री. मनोहर यादव, श्री. आबासो बोत्रे, श्री. नानासो चाळके माजी ग्रामपंचायत सदस्य भरत माने (नांगरे पाटील ) माजी ग्रामपंचायत सदस्य कुंभारगाव श्री जयेद्र माने श्री. सुभाष माने, संजय माने, सुरेश माने,राहुल माने,यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह मान्याचीवाडी व्याफारी मंडळ, ग्रामस्थ, महिलांमंडळ मोठया संख्येने उपस्थित होते. 
शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्य करत असताना चंद्रकांत माने यांनी घणसोली परिसरात निःस्वार्थ जनसेवेचा वसा घेतला आहे. परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासकामांसाठी आक्रमकपणे लढणारे नेतृत्व म्हणून 'आप्पा' यांची ओळख आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांपासून ते युवकांच्या रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. 

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि "आप्पा आगे बढो"च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना माजी सभापती रमेश मोरे बापू म्हणाले, "चंद्रकांत माने हे केवळ नेते नाहीत, तर प्रत्येक कुटुंबातील सदस्य आहेत. घणसोलीच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे." उपसरपंच किशोर मोरे यांनीही आप्पांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. 

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे घणसोलीच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री जयेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र माने यांनी केले तर सूत्रसंचालन श्री उमेश माने यांनी केले आभार मानले 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...