शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

कराड : निबंध स्पर्धेत शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्रा. सुरेश रघुनाथ यादव यांनी पटकवला द्वितीय क्रमांक

थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून १९८५ पासून सर्वत्र साजरा केला जातो. ते एक समाजसुधारक, तत्त्वज्ञानी आणि विचारवंत होते. तरुणांची शाश्वत ऊर्जा जागृत करण्याचा तसेच देशाचा विकास करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कवायत करून, स्वामी विवेकानंदांवर भाषण, वक्तृत्व -वादविवाद स्पर्धा, गाणी, निबंध-लेखन स्पर्धा, परिसंवाद इत्यादी साजरे केले जातात.
या निमित्ताने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा करतात 
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. सुरेश यादव सर

दि.12 जानेवारी ते 19 जानेवारी हा विवेकानंद सप्ताह संपूर्ण भारतात साजरा केला जातो 
संस्थेच्या वतीने सातारा येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती 
त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 25 शिक्षकांनी भाग घेतला होता 
स्पर्धेचा निकाल दि.30 जानेवारी ला जाहीर करण्यात आला  यामध्ये प्रथम क्रमांक रामकृष्ण विद्यालय नागठाणे येथील मराठी विषयाचे प्रा.श्री जनार्दन मधुकर कांबळे सर या सरांनी पटकावला व द्वितीय क्रमांक प्राध्यापक  श्री.सुरेश रघुनाथ यादव सर शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड यांनी पटकवला,तृतीय क्रमांक काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले येथील प्राध्यापक डॉ. गवराम नाना पोटे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार 
प्राधान करण्यात आला या तीनही विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ही स्पर्धा विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...