बुधवार, ८ जानेवारी, २०२०

कुंभारगाव ता.पाटण येथे आ.बाळासाहेब पाटील आणि आ.शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार :

कुंभारगाव,ता.पाटण प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन कॅबिनेट मंत्रीपदी आ.बाळासाहेब पाटील व आ.शंभूराज देसाई यांची ग्रह ( ग्रामीण ) अर्थ व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कॊशल्य विकास उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य पदी निवड झाली त्यानिमित्ताने रविवार दि.१२ जानेवारी २०२० रोजी  दु. ठीक.४ वाजता कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल मधील पटांगणात कुंभारगाव,काळगाव जि.प.गटातील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे 
मा.मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) 
यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्याऱ्या ह्या सत्कार समारंभसाठी कुंभारगाव,काळगाव परिसरातील सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रा. सदस्य,वि. का.सह सेवा सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन सदस्य,सर्व सहकारी संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ व  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सत्कार समारंभाचे संयोजक  मा.ड्रॉ.दिलीपराव चव्हाण मा.चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखाना।दोंलतनगर यांनी केली आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...