सोमवार, २७ जानेवारी, २०२०

मौजे गलमेवाडी ग्राम विकास मंडळातर्फे जेष्ठ महिलांना मोफत गणपतीपुळे दर्शन

मौजे गलमेवाडी ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने वृद्ध महिलांसाठी मोफत गणपतीपुळे दर्शन सहल आयोजित केली होती दिनांक 24 जानेवारी रोजी।गावातुन 
दोन ट्रॅव्हल्स बस मधून एकूण ८६ वृद्ध महिलांना गणपतीपुळे प्रस्थान केले दि.25 रोजी सर्व महिलांनी श्री गणेश दर्शनाचा लाभ घेतला
मंडळाच्या वतीने गावात समाजपयोगी अनेक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये प्राथमिक शाळेतील 1 ली ते 10 पर्यंत प्रथम येणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थीना शालेय उपयोगी साहित्य पुस्तके, गणवेश वाटप केले जाते 
श्री नाईकबा महिला ग्रह उद्योग च्या मदतीने होतकरू व गरजू महिलांना स्वयं रोजगार प्रशिक्षण देऊन साहित्य वाटप केले जाते.आरोग्य शिबीर आयोजीत केले जाते त्यामध्ये डॉक्टर इलाज साठी थेट आर्थिक मदत, मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप केले जाते 
वृक्षारोपण, जेष्ठ नागरिकांचा सेन्ह मेळाव्याचे आयोजन केले जाते त्यामुळे गावात एकता आणि एकात्मता राहावी सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी व गावच्या विकासासाठी मंडळ सतत प्रयत्नशील असते अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री संपत चोरगे, सचिव श्री रामचंद्र चोरगे,खजिनदार श्री बापूराव चोरगे यांनी कुमजाई पर्व शी बोलताना दिली 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...