बुधवार, २२ जानेवारी, २०२०

गगनगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

अहमदनगर, पारनेर 22 जानेवारी :- राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (तालुका पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या तीर्थक्षेत्रावर श्री स्वामी गगनगिरी महाराज समाधी(पुण्यतिथी) सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला.देवस्थान ट्रस्ट,जय गगनगिरी सेवा मंडळ,पिंपळगाव रोठा,ग्रामस्थ यांनी सोहळयाचे आयोजन केले होते. सन २०१६ साली कोरठण गडावरील ध्यान मंदिरात गगनगिरी महाराजांच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.कोरठण खंडोबा देवस्थान व महाराज यांचे अतुट नाते होते.खंडोबा मंदिराचा सुवर्ण कलशा रोहण सोहळा गगनगिरींच्या हस्ते झाला होता.कोरठणला महाराजांचा पुण्यतिथी सोहळा समाधी दिवस २०१७ सालापासून सुरु करण्यात आला आहे.सकाळी ६ वाजता ध्यान मंदिरात बाबाजी गायकवाड,चांगुणाबाई गायक वाड,विक्रम ढोमे व नंदाबाई ढोमे यांच्या हस्ते श्री गगनगिरींच्या मुर्तीची अभिषेक व महापुजा,महाआरती करण्यात आली.मंदिरासमोर सकाळी ७ ते ९ वाजता होमहवन यज्ञ करण्यात आले.सकाळी ९ वाजता गगनगिरींच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून भजन दिंडी सोहळ्याने कोरठण गडाला प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली.
मिरवणुक सभामंडपाजवळ आल्यानंतर महाआरती करण्यात आली. सकाळी ११ वाजता भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज पवणे शास्त्री(कामशेत,मावळ) यांचे कीर्तन झाले.दुपारी १ वाजता उपस्थित भाविकांना जय गगनगिरी सेवाभावी मंडळ,पिंपळगाव रोठा व स्वप्नील घुले परिवार (सुपा) यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला.दुपारनंतर संगीत भजन गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जालिंदर खोसे यांनी सुत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...