नवी मुंबई प्रतिनिधी ::
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले १५ नगरसेवक घरवापसी करणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून नवी मुंबई भाजपला खिंडार पाडण्याच्या तयरीत आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला खिंडार पडणार असल्याची माहिती आहे. कारण भाजपचे मातब्बर नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता जात भाजपचा झेंडा फडकला.पण आता भाजपचे १५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खरंतर नवी मुंबईमध्ये पालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडून सत्ता काढून घेणं तसं सोप नसलं तरी अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये नाराज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. भाजपचे १५ नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात भाजपच्या नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा