गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; शनिवारी आरक्षण सोडत

नवी मुंबई प्रतिनिधी : 
एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग आरक्षण सोडत निवडणूक आयोगाकडून येत्या 1 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे
या सोडतीमध्ये विद्यमान नगरसेवकांपैकी कुणाची विकेट निघणार, कोणाची हॅट्रीक हुकणार आणि कोणाला लॉटरी लागणार याकडे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची ही निवडणूक 111 प्रभागांमधून होणार आहे. त्यामध्ये महिलांच्या 56 तर पुरुषांच्या 55 प्रभागांचा समावेश आहे. यामध्ये 69 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 30 प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी, 10 प्रभाग एससी आणि दोन प्रभाग एसटी प्रवर्गासाठी असणार आहेत. एससी आणि एसटी प्रवर्गांच्या प्रभागाची सोडत निघणार नाही. ते लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोग ठरवणार आहे. Ad
मात्र त्यानंतर या दोन्ही प्रवर्गांमध्ये महिला आणि पुरुष गटासाठी प्रभागांची सोडत काढण्यात येणार आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी गटातील प्रभागांची निवड ही पूर्णपणे सोडतीमधूनच होणार आहे. ही लॉटरीची प्रक्रिया शनिवारी सकाळी 11 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात पार पडणार आहे.

अडीच महिन्यांचा कालावधी

एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत डिसेंबरमध्येच निघणे आवश्यक होते. मात्र पॅनल पद्धत रद्द झाल्यामुळे ही सोडत सुमारे दोन महिने लांबणीवर पडली. सोडतीच्या प्रक्रियेनंतर सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने त्यांची पुरती दमछाक होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...