गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश

नांदेड, प्रतिनिधी 30 जानेवारी : 
पती शहीद झाल्यानंतर मुलीला शाळेत प्रवेश घेताना आलेल्या अडचणींमुळे वीरपत्नीच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. 'माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं,' अशा शब्दांत शहीद जवान संभाजी कदम यांच्या पत्नीने आपला संताप व्यक्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम यांचे पती संभाजी कदम हे काश्मीरमधील नागरौता येथे 29 नोव्हेंबर 2016 रोजी शहीद झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर वीरपत्नी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने आपल्या मुलीला चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र आपल्या असंवेदनशील व्यवस्थेनी शीतल कदम यांची निराशा केली आणि त्यातूनच मग कदम यांच्या भावना तीव्र शब्दांत समाजासमोर आल्या आहेत.
जिथे आम्ही गेलो तिथं साधी आमची विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही प्रतिसाद मिळाला नाही. या पत्रांचा काहीही फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली,' असं शीतल कदम यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था किती निगरगट्ट असू शकते, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
शहीद संभाजी कदम यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी आणि आता 6 वर्षांची एकुलती एक मुलगी आहे. या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला म्हणून शीतल कदम शहरातील ज्ञानमाता इंग्लिश स्कुल मध्ये गेल्या. पण मागील वर्षी या वीरपत्नीला परत पाठवण्यात आले आणि यंदाही तीच गत. अखेर त्यांनी शाळेतील लोकांना आपण वीरपत्नी आहोत माझ्या मुलीला प्रवेश द्या जी काही फी असेल ती भरायला तयार आहे, असेही सांगितले. पण तरीही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं वीरपत्नी कदम यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांनी शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या संस्था चालकाला बोलावून तंबी दिली. या शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांदेडकर शाळेसमोर आंदोलन करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...