टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील लोकांना वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांची रात्र जागरणात आणि दिवस झोपण्यात जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून जनावरांना वाचविण्यासाठी मेंढपाळ आणि गुराख्यांची तारांबळ उडते. रात्री मशाल पेटवून त्यांना बिबट्यापासून संरक्षण करावे लागते. पारनेरचा ग्रामीण भाग दहशतीखाली आहे. मेंढ्यांची सुटका करताना एका दाम्पत्याला मोठा संघर्ष करावा लागला.
नागरिक दहशतीखाली
कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील विरोली रस्ता परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने या भागातील नागरिक दहशतीखाली आहेत. याच रस्त्यावरील पाटील मळा येथील शेतात बसविलेल्या मेंढ्यांवर ताव मारण्याच्या तयारीत आलेल्या दोन बिबट्यांना मेंढपाळाच्या समयसूचकतेमुळे रिकाम्या पोटी पळून जावे लागले.विरोली रस्त्यावरील पाटील मळा परिसरातील बाळासाहेब पोपट ठुबे यांच्या कांदापिकाची काढणी केलेल्या शेतात रेवणनाथ रावसाहेब डोईफोडे पत्नीसह शेळ्या व मेंढ्या घेऊन रात्री मुक्कामी होते. नऊच्या सुमारास दोन बिबटे मेंढ्यांच्या दिशेने येताना पाहून, रेवण डोईफोडे यांनी मशाल पेटवून बिबट्यास घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरण्याऐवजी एक बिबट्या जोरजोरात गुरगुरत पुढे येण्याचा प्रयत्न करीत होता. हे पाहून डोईफोडे यांच्या पत्नीही मदतीसाठी जोरात आवाज देऊ लागल्या.
दुचाकी वाहनांचा आवाज ऐकून गेले
परिसरातील प्रगतशील शेतकरी अण्णा सोनावळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठुबे तरुणांना एकत्र घेऊन घटनास्थळी गेले. चारचाकी व काही दुचाकी वाहनांचा प्रकाश व आवाज ऐकून बिबटे अगदी शांतपणे शेजारील ज्वारीच्या पिकात निघून गेले आणि मोठा अनर्थ टळला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र सुरवातीला तो होऊ शकला नाही. वनाधिकारी निर्मला शिंदे यांच्याशी मात्र संपर्क झाला. बिबट्या पकडण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा, त्यानंतर तातडीने पिंजऱ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परिसरात दोन बिबटे असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा